• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • C60 Squad Kills 13 Naxalites But How Exactly Was The Team Formed Find Out Nrat

‘सी-60’ पथकाने केला १३ नक्षलवाद्यांचा खात्मा; पण ‘हे’ पथक नेमकं स्थापन कसं झालं? जाणून घ्या!

गडचिरोलीतील (gadchiroli) पयडी-कोटमी जंगलात आज 'सी ६०' पोलिस पथक (C60 police force) आणि नक्षलवाद्यांमध्ये (naxal) मोठ चकमक उडाली. यामध्ये १३ नक्षलवादी ठार (13 naxal killed) झाले. यापैकी ८ जणांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले. आजची ही कारवाई सी-६० पथकाचे मोठे यश आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: May 21, 2021 | 06:05 PM
‘सी-60’ पथकाने केला १३ नक्षलवाद्यांचा खात्मा; पण ‘हे’ पथक नेमकं स्थापन कसं झालं? जाणून घ्या!

प्रतिकात्मक फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

गडचिरोली (Gadchiroli).  पयडी-कोटमी जंगलात आज ‘सी ६०’ पोलिस पथक (C60 police force) आणि नक्षलवाद्यांमध्ये (naxal) मोठ चकमक उडाली. यामध्ये १३ नक्षलवादी ठार (13 naxal killed) झाले. यापैकी ८ जणांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले. आजची ही कारवाई सी-६० पथकाचे मोठे यश आहे. पण, हे सी-६० पथक कोणी स्थापन केलं आणि हे स्थापण्यामागचा उद्देश काय होता? हे तुम्हाला माहिती आहे का? (how C60 police force is formed in gadchiroli)

काही वर्षांपूर्वी गडचिरोली आणि चंद्रपूर हे दोन्ही जिल्हे एकत्रच होते. त्याकाळात नक्षली चळवळ चांगलीच सक्रीय होती. नक्षल्यांना जंगलाची माहिती असल्याने ते पोलिसांना चकमा देत होते. त्यामुळे नक्षलवाद्यांचे कट उधळण्यात पोलिसांना यश मिळत नव्हते. त्यामुळे तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक के. पी. रघुवंशी यांनी सन १९९० मध्ये सी-६० पथकाची स्थापना केल्याची माहिती निवृत्त पोलिस सहआयुक्त रवींद्र कदम यांनी दिली.

[read_also content=”सिहोरा/ गावाकडे परतलेल्या मजुरांचे हालच; हाताला कामच नसल्याने जगायचे तरी कसे? मजुरांना सतावतोय प्रश्न https://www.navarashtra.com/latest-news/the-condition-of-the-laborers-returning-to-the-village-how-to-live-without-hands-the-question-plaguing-the-workers-nrat-132155.html”]

जंगलात कुठूनतरी गोळ्या झाडून नक्षलवादी पसार व्हायचे आणि पोलिस त्या दिशेने अंदाज घेत गोळीबार करत राहायचे. तेवढ्याच वेळात ते दुसरीकडे कुठेतरी कारवाई करून मोकळे व्हायचे. त्यामुळे यावर उपाय म्हणून सी-६० पथक तयार करण्यात आले. यामध्ये ६० शस्त्रसज्ज आणि पूर्ण प्रशिक्षित जवानांचा समावेश करण्यात आला. हा प्रयोग यशस्वी होत असल्यामुळे नंतर ६० चे १०० – १५० अशी वाढ करत आज या पथकात जवळपास १००० जवान आहेत. या पथकाने नंतर मोठमोठ्या चकमकी यशस्वी केल्या. आज एटापल्लीच्या पयडी-कोटमीच्या जंगलात सी-६० केलेली ही कारवाई मोठी आहे.

सी-६० चे पथक का स्थापन करण्यात आले?
गडचिरोली जिल्ह्यात नक्षली कारवाया वाढू लागल्या. त्यामुळे यावर प्रतिबंध घालण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याचेच दोन विभागात (उत्तर विभाग आणि दक्षिण विभाग) विभाजन करण्यात आले. दक्षिण भागात नक्षली कारवायांमध्ये वाढ झाल्याने प्राणहिता उप मुख्यालय येथे मार्च १९९४ साली सी-६० च्या दुसऱ्या मुख्यालयाची स्थापना झाली. सी-६० चा प्रत्येक जवान हा आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल चळवळीला आळा घालण्यासाठी अथक परिश्रम करीत आहे. हे पथक नक्षल्यांचा कर्दनकाळ म्हणून ओळखले जाते. सी-६० पथकाला यापूर्वी (क्रॅक कमांडो) या नावाने सुध्दा ओळखले जात होते. या सी-६०चे पोलिस निरीक्षक एस. व्ही. गुजर हे पहिले प्रभारी अधिकरी होते.

विशेष म्हणजे गडचिरोली पोलिसांत जे स्थानिक कर्मचारी होते त्यांना जंगलाची, जिल्ह्याची, गावांची आणि ग्रामस्थांबाबत सर्व माहिती होती. त्यामुळे नक्षल्यांबाबतच्या खबरी मिळविणे कठीण नव्हते. त्यामुळे सी-६० पथक स्थापन करताना गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे पथकाला नक्षल्यांची माहिती मिळू लागली. नक्षल्यांचे कट उद्ध्वस्त करण्यात यश मिळू लागले, असेही कदम यांनी सांगितले.

काळानुरूप कारवायांचे स्वरुप बदलले. आता अत्याधुनिक शस्त्रांचा वापर केला जातो. तसेच नक्षल्यांच्या कटाची माहिती मिळाली की क्षणाचाही विलंब न करता कारवाई केली जाते. प्रशिक्षित सी-६० येथील जवान कठोर परिश्रम घेऊन गडचिरोली जिल्ह्याच्या काना कोपऱ्यात जाऊन पहाडी व अतिदुर्गम भागांमध्ये नक्षल विरोधी अभियान राबवितात. दरम्यान, नक्षल चळवळीमध्ये असणाऱ्यांच्या परिवाराला व नातेवाइकांना भेटून त्यांना आत्मसमर्पणाबाबत विविध शासकीय सुविधा व योजनांचे मार्गदर्शन करून त्यांचा लाभ घेण्यास त्यांचे मन परिवर्तन करून त्यांना लोकशाहीच्या विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्यास प्रवृत्त करतात, असेही कदम यांनी सांगितले.

Web Title: C60 squad kills 13 naxalites but how exactly was the team formed find out nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 21, 2021 | 06:05 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Gadchiroli
  • Naxal attack

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: “जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा…”; काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
1

Devendra Fadnavis: “जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा…”; काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bihar Election Result 2025 : निवडणूक आयोगाच्या वेबसाइटमध्ये तांत्रिक बिघाड, आघाडीवरील उमेदवार ‘पराभूत’ म्हणून घोषित!

Bihar Election Result 2025 : निवडणूक आयोगाच्या वेबसाइटमध्ये तांत्रिक बिघाड, आघाडीवरील उमेदवार ‘पराभूत’ म्हणून घोषित!

Nov 14, 2025 | 11:23 AM
३० – ६५ वयोगटातील अनेक लोक मूत्रपिंड आणि हृदयाच्या समस्यांनी त्रस्त! चाचणीनंतर Diabetes चे निदान

३० – ६५ वयोगटातील अनेक लोक मूत्रपिंड आणि हृदयाच्या समस्यांनी त्रस्त! चाचणीनंतर Diabetes चे निदान

Nov 14, 2025 | 11:14 AM
Sindhudurg News: ठेकेदाराकडून कमिशन मिळवण्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी टेंडर काढले नाही; ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांचा गंभीर आरोप

Sindhudurg News: ठेकेदाराकडून कमिशन मिळवण्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी टेंडर काढले नाही; ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांचा गंभीर आरोप

Nov 14, 2025 | 11:14 AM
ओव्हरटेकचा प्रयत्न जीवावर बेतला; ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडून एकाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

ओव्हरटेकचा प्रयत्न जीवावर बेतला; ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडून एकाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

Nov 14, 2025 | 11:06 AM
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ स्वस्त पदार्थांचे सेवन, कधीच होणार नाही मधुमेह

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ स्वस्त पदार्थांचे सेवन, कधीच होणार नाही मधुमेह

Nov 14, 2025 | 11:00 AM
‘Asim Munir चा नवा ‘Bleed India’ प्लॅन? पाकमध्ये लष्करी सत्ता केंद्रीकृत; भारतावर पुन्हा कारगिलसारख्या छुप्या युद्धाची छाया

‘Asim Munir चा नवा ‘Bleed India’ प्लॅन? पाकमध्ये लष्करी सत्ता केंद्रीकृत; भारतावर पुन्हा कारगिलसारख्या छुप्या युद्धाची छाया

Nov 14, 2025 | 10:56 AM
Share Market Crash: बिहार निवडणूक निकालांचा शेअर बाजारावर तगडा परिणाम! भारतीय बाजार उघडताच घसरला

Share Market Crash: बिहार निवडणूक निकालांचा शेअर बाजारावर तगडा परिणाम! भारतीय बाजार उघडताच घसरला

Nov 14, 2025 | 10:53 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan News : कल्याणमध्ये प्रथम येणाऱ्याला एक्टिवा भेट! शिंदे गटाकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखी योजना

Kalyan News : कल्याणमध्ये प्रथम येणाऱ्याला एक्टिवा भेट! शिंदे गटाकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखी योजना

Nov 13, 2025 | 07:55 PM
Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

Nov 13, 2025 | 07:42 PM
Raigad : कर्जतमध्ये शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का

Raigad : कर्जतमध्ये शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का

Nov 13, 2025 | 07:34 PM
Raigad : महाडमध्ये राष्ट्रवादी-भाजप युतीची घोषणा; स्थानिक राजकारणात नवी समीकरणं

Raigad : महाडमध्ये राष्ट्रवादी-भाजप युतीची घोषणा; स्थानिक राजकारणात नवी समीकरणं

Nov 13, 2025 | 07:30 PM
Palghar : धनानी नगरमधील 17 एकर अतिक्रमण हटवण्याचे न्यायालयाचे आदेश

Palghar : धनानी नगरमधील 17 एकर अतिक्रमण हटवण्याचे न्यायालयाचे आदेश

Nov 13, 2025 | 07:26 PM
Sangli News : वारकऱ्यांसाठी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचा उपक्रम

Sangli News : वारकऱ्यांसाठी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचा उपक्रम

Nov 13, 2025 | 07:19 PM
Navi mumbai : सीवुडमधील उद्यान – गटार घोटाळ्यावर माजी नगरसेवक जाधवांचा हल्लाबोल

Navi mumbai : सीवुडमधील उद्यान – गटार घोटाळ्यावर माजी नगरसेवक जाधवांचा हल्लाबोल

Nov 13, 2025 | 03:07 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.