ठाणे : खासदार श्रीकांत शिंदे (Skrikant Shinde) यांच्या मतदारसंघात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांचा दुसऱ्यांदा दौरा होतोय त्यामुळे या मतदारसंघावर भाजपचे नजर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. याबाबत अनुराग ठाकूर यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आम्ही मिळून लढू व ताकदीने लढू तुम्ही चिंता करू नका असा सल्ला माध्यमांसोबत बोलताना दिला.
[read_also content=”डोक्युमेंट्री प्रकरण आलं अंगलट! बीबीसीच्या दिल्ली-मुंबई कार्यालयांवर आयकर विभागाचे छापे, कार्यालये सील https://www.navarashtra.com/india/income-tax-raid-on-bbc-office-in-delhi-mumbai-office-seal-nrps-369665.html”]
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आज डोंबिवलीत आले आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्राचा आज ते डोंबिवलीत आढावा घेणार आहेत. यावेळी सहा विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाष्य केलं. भाजपचे मिशन ४०० प्लस हे उद्दिष्ट असून त्यादृष्टीने महाराष्ट्रातील १६ लोकसभा मतदार संघात (विशेषतः जेथे सध्या भाजपचे खासदार नाहीत अशा लोकसभा मतदारसंघात) केंद्रीय मंत्र्यांचे दौरे आयोजीत करण्यात येत आहेत. त्या निमित्ताने कल्याण लोकसभेमध्येदेखील केंद्रीय माहिती, प्रसारण मंत्री, युवा व्यवहार क्रीडा मंत्री अनुराग यांंनी हजेरी लावली. तर, पुढे बोलताना यंदा मोठा विजय संपादन करू असं बोलत अप्रत्यक्षरीत्या मतदारसंघ युतीत लढणार असल्याचे संकेत दिले .
जेडीयू नेता गुलाम रसूल यांनी आतंकवाद थांबवायचा असेल तर मुस्लिम तरुणांना सैन्यात संधी द्या असं वक्तव्य केलं होतं. याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी देशात खेळाचा संघ असेल किंवा सैन्य असेल जाती-धर्माच्या आधारावर नव्हे तर त्यांच्या योग्यतेवर क्षमतेवर घेण्यात येते असा टोला लगावला. तर, संजय राऊत यांनी फडणवीस दहावा अजुबा आहे व आधीचे दोन अजुबे हे दिल्लीत बसले असल्याचे टीका केली होती. या टीकेवर ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिले ..अनुराग ठाकूर यांनी जे असं वक्तव्य करतात त्यांच्यावर विश्वास कोण ठेवतो …जे घोटाळे केले त्याच्यावर त्यांनी आधी उत्तर द्यावेत असा पलटवांर संजय राऊत यांच्यावर केला.