भिवंडी : भिवंडी (Bhiwandi News) शहरातील 40 ते 45 वर्ष जुन्या यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळल्याने मोठा अपघात झाला (Factory Wall Collapsed) आहे. यावेळी कारखान्याजवळ काही मुलं खेळत होती. यावेळी ढिगाऱ्याखाली दोन अल्पवयीन मुलं अडकली. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मुलांना ढिगाऱ्याबाहेर काढलं, परंतु त्यापैकी एका मुलाचा मृत्यू झालाय तर दुसरा गंभीर जखमी असून त्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
[read_also content=”दिल्लीत पंतप्रधान निवासस्थानावर ड्रोन आढळल्यानं खळबळ! पोलीसांकडून शोध सुरू https://www.navarashtra.com/india/a-drone-was-found-at-the-prime-minister-narendra-modi-residence-in-delhi-police-are-searching-the-drone-nrps-426618.html”]
ठाणे तसेच ठाण्याजवळील परिसरात गेल्या काही दिवसापासून संततधार सुरू आहे. अशातच भिवंडी शहरातील दिवानशाह दर्गा रोड येथील कोतवाल शाह दर्गाच्या जवळ असेलेल्या 40 ते 45 वर्ष जुन्या यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळली. यावेळी परिसरातील दोन मुलं तिथं जवळपास खेळत होती. कारखान्याची भितं ही दोन्ही मुलांच्या अंगावर पडली. त्यामुळे ही मुलं ढिगाऱ्याखाली अडकली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. ही बाब लक्षात येताच तत्काळ स्थानिकांच्या मदतीने शोध मोहीम सुरू करण्यात आली. कोसळलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्या खालून मुलांना बाहेर काढण्यात स्थानिकांना यश मिळालं. परंतु दुर्देवाने त्यापैकी एका मुलाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी असून त्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मोहम्मद हुसेन इरफान अन्सारी ( 10 वर्ष) असे ढिगाऱ्यखाली दबून मयत झालेल्या मुलाचे नाव आहे तर रिजवान अन्सारी (वय 14 वर्ष) असे जखमी मुलाचे नाव आहे.
सध्या मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनाकरता पाठवण्यात आले आहे. यासंदर्भात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस या संपूर्ण घटनेची चौकशी करीत आहेत.