पाटणा : भारताला २०४७ पर्यंत इस्लामिक देश (Islamic Country) बनविण्यासाठी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) या संघटना मोहीम चालवित असल्याचे कारस्थान उघडकीस आले आहे. पाटण्यातील (Patna) फुलवारीशरीफ भागातून सिमी (Simi) या बंदी असलेली दहशतवादी संघटनेचा माजी सदस्य अतहर परवेझ आणि झारखंडचे (Jharkhand) निवृत्त पोलीस निरीक्षक मोहंमद जलालुद्दिन यांना अटक (Arrest) केली. त्यांनी सदर माहिती पोलिसांनी दिली. या दोघांकडे पीएफआयचा झेंडा, या संघटनेची पत्रके, माहितीपुस्तके आणि गोपनीय कागदपत्रे जप्त केली.
२०४७पर्यंत भारत हा इस्लामी राष्ट्र बनण्यासाठीच्या मोहिमेशीसंबंधित कागदपत्रेही पोलिसांना सापडली आहेत. परवेझ आणि जलालुद्दीन हे दोघेही पीएफआय आणि एसडीपीआयचे सक्रिय सदस्य आहे. या संघटनांचा सिमीशी संबंध आहे. ‘ज्याप्रमाणे आरएसएस शाखा सुरू करून लोकांना प्रशिक्षण देतात, त्याप्रमाणे पीएफआयही शारीरिक प्रशिक्षण देते.
गेल्या काही दिवसांत पीएफआयच्या शाखेत सहभागी झालेल्या २६ जणांची माहिती समजली आहे. त्यापैकी १२ लोकांना अटक करून चौकशी सुरू केली आहे. तसेच, बिहारमध्ये पीएफआयवर बंदी नाही,’ असे पाटणा पोलिसांनी सांगितले.