काही दिवसांपूर्वीच ‘डिलिव्हरी बॉय’ (Delivery Boy) चित्रपटाचं एक भन्नाट पोस्टर आणि टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आलं. सोशल मीडियावर झळकलेल्या पोस्टर आणि टीझरला काही दिवसातच लाखो प्रेक्षकांची पसंती मिळत असतानाच चित्रपटातील गाणेही प्रदर्शित झाले. यालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता चित्रपटाचा हटके टिझर रिलिज करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्कंठा प्रचंड वाढवून ठेवली होती त्यातच आता ‘डिलिव्हरी बॉय’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाल्याने प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
[read_also content=”मस्ती करतो म्हणून जन्मदात्या पित्यानंच मुलाचा घेतला जीव, कोल्ड्रींकमध्ये मिसळलं विष अन्….प्यायला दिलं! https://www.navarashtra.com/crime/father-killed-son-giving-him-poisonous-powder-into-clod-drink-in-solapur-nrps-502901.html”]
सरोगसी हा शब्द आता आपल्याला बऱ्यापैकी परिचित झाला आहे. हा शब्द जरी आपण आत्मसात केला असला तरी याची प्रक्रिया अनेकांच्या पचनी पडत नाही. याचे वैज्ञानिक आणि भावनिक महत्व आजही अनेक जण मान्यच करत नाहीत. याच संकल्पनेवर आधारित ‘डिलिव्हरी बॉय’ हा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी चित्रपटातील आठ गर्भवतींच्या ‘डोहाळे जेवणाचा’चा खास कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. अतिशय पारंपरिक आणि राजेशाही थाटात या डोहाळे जेवणाचा सोहळा संपन्न झाला.
मोहसीन खान दिग्दर्शित या चित्रपटात प्रथमेश परब, पृथ्वीक प्रताप आणि अंकिता लांडे पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सोहळ्याला चित्रपटातील कलाकारांसह बॅालिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनिस बाझमी, मुश्ताक खान आदी मान्यवर उपस्थित होते. सिनेपोलिस आणि दीपा नायक प्रस्तुत, लुसिया एंटरटेनमेंट प्रोडक्शन निर्मित ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाचे डेव्हिड नादर निर्माते आहेत तर फेलिक्स नादर, विकास श्रीवास्तव, विकास सिंग, राझ धाकड आणि ऋषिकेश पांडे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचे लेखन राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी केले आहे.