वीज पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
पाटस: दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथे अंगावर विज पडल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
संजय जगन्नाथ जगताप (वय ५०,रा.मगरमाळा, बोरीपार्धी ता. दौंड जि.पुणे ) असे या घटनेत मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
शुक्रवारी ( दि १३) दुपारी दौंड तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळ आणि विजेच्या कडकटासह मुसळधार पावसाने सुरुवात केली. तालुक्यातील बोरीपार्धी येथील शेतकरी संजय जगताप हे त्यांच्या शेतात काम करीत असताना दुपारी साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास
अंगावर वीज कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला . या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
कराड शहरासह तालुक्याला बसला वादळी पावसाचा तडाखा
कराड शहर परिसरासह संपूर्ण तालुक्यात गुरुवारी वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. यामध्ये कराड दक्षिणमधील बेलवडे बुद्रुक, कासारशिरंबे, कालवडे, नांदगाव, काले, वाठार, रेठरे खुर्द परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने शेत-शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे परिसरातील शेती मशागतींच्या कामांचा मोठा खोळंबा झाला आहे.
कराड शहरासह तालुक्याला बसला वादळी पावसाचा तडाखा; बेलवडे परिसरात तर ढगफुटीसदृश्य पाऊस
गुरुवारी सायंकाळी सहा वाजल्याच्या सुमारास सुरू झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे कराड शहरातील वाहतूक विस्कळीत झाली. तर महामार्गावरील वाहतुकही धीम्या गतीने सुरू असल्याचे दिसून आले. शहरातील नाले तुडुंब वाहून अनेक ठिकाणी रस्त्यांवरील चेंबरमधून पाणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याने पादचाऱ्यांची कसरत झाली. तसेच सकल भागातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. त्याचबरोबर गुरुवारी आठवडी बाजार असल्याने अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी, व्यापारी व नागरिकांची मोठी तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
रिसोड तालुक्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा
राज्यातील काही भागांत पाऊस होताना दिसत आहे तर काही ठिकाणी अद्यापही प्रतिक्षाच आहे. अनेक भागात बुधवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्याने जोरदार तडाखा दिला आहे. तर वाशिमच्या रिसोड तालुक्यात देखील वादळी वाऱ्याचा प्रभाव पाहिला मिळाला. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे छत उडून गेली असून, मोठ्या प्रमाणात अनेक कुटुंबांचं नुकसान झाले आहे.
वीज पडून गोठ्याला लागली आग
जांब आढाव गावात बुधवारी सायंकाळी विष्णू भानुदास जाधव या शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्यावर वीज कोसळून गोठ्याला आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये गोठ्यात ठेवलेले कृषी पंप, पाईप, केबल आणि जनावरांचा चारा जळून खाक झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.