मुंबई : बेशरम रंग या गाण्यावरुन आणि त्यातल्या दीपिका पादुकोणच्या कपड्यांवरुन वादात सापडलेल्या बहुचर्चित पठमा सिनेमाचा ट्रेलर (Pathaan Trailer) रीलिज झालाय. शाहरुख खान (shahrukh khan) या सिनेमात नायकाच्या भूमिकेत आहे. शाहरुखच्या या मेगा बजेट मूव्हीचं ट्रेलर मंगळवारी सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी रीलिज करण्यात आला.
पठाणच्या ट्रेलरमध्ये शाहरुख आणि जॉ़न अब्राहमचे एक्शन सीन दाखवले आहेत. मात्र वादात सापडलेले बेशरम गाणं या ट्रेलरमध्ये नाही. ही वेळापूर्वीच आलेल्या या ट्रेलरला फॅन्सचाही चांगला प्रतिसाद मिळतोय.
पठाण सिनेमावरुन झालेल्या प्रचंड वादानंतर सेन्सॉर बोर्डानं सिनेमातील १० सीन बदलण्यास सांगितलं होतं. याबरोबरच सिनेमातील काही संवादही बदलणम्यात आलेत. या सिनेमाचा टीझर आणि गाणी रीलिज झाल्यानंतर यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. काही जणांचा या गाण्याच्या ओळींना विरोध होता. तर काही जणांना दीपिकाची भगवी बिकिनी खटकली होती. त्यानंतर सेन्सॉर बोर्डानं हा निर्णय घेतलाय.
या सिनेमातील रॉ हा शब्द बदलून त्याऐवदी हमारे, लंगडे लूलेच्या ऐवजी टूटे फुटे, पीएम या ऐवजी राष्ट्रपती वा मंत्री, पीएमओ हे शब्द १३ ठिकाणांहून काढण्यात आले.
या सिनेमानं चार वर्षांनी शाहरुख मोठ्या पडद्यावर परततो आहे. यापूर्वी २०१८ साली झइरो या सिनेमात शाहरुखला पाहण्याची संधी रसिकांना मिळाली होती. नायकाच्या रुपात पठाणमधून जोरदार कमबॅक करण्याचा त्याचा मानस आहे. या सिनेमाचं बजेट २५० कोटी इतकं आहे. सिनेमाचे मीडिया राईट्स १०० कोटींना विकण्यात आलेत. २५ जानेवारीला रीलिज सिनेमात शाहरुखसोबत, जॉन अब्राम, दीपिका यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. यशराज फिल्मसची ही स्पाय थ्रिलर मूव्ही आहे. २५ जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होईल, त्यानंतर आणखी वाद रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.