देशात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. दिल्लीसह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने (Coronavirus) पुन्हा डोके वर काढले आहे. राज्यात कोरोनारुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून, गेल्या 24 तासात देशात 5,357 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तर, 32 हजार रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या ३२ हजार ८१४ सक्रिय रुग्ण आहेत. तर 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शनिवारी देशभरात 11 कोरोनाबाधितांना आपला जीव गमवावा लागला. यापैकी तीन गुजरातमधील, दोन हिमाचल प्रदेशातील आहेत. बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि केरळमधील प्रत्येकी एका संक्रमित व्यक्तीचा मृत्यू झाला. सध्या कोरोनाच्या ०.०७ टक्के रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर ९८.७५ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. 1.19 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला.
कोरोना लसीचे ६६ कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. लसीकरण मोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे.
आरोग्यमंत्र्यांनी राज्यांना केले सतर्क