नवी दिल्ली: देशात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. दिल्लीसह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने (Coronavirus) पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या 24 तासात देशात 7,830 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली, तर 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 40,215 वर गेली आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये बुधवारी 7,830 नवीन कोरोनाव्हायरस संसर्गाची एक दिवसीय वाढ झाली, जी 223 दिवसांमधील सर्वाधिक आहे. गेल्या 24 तासात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील एकूण मृत्यूची संख्या 5,31,016 झाली आहे. या मृतांमध्ये दिल्ली, पंजाब आणि हिमाचल प्रदेशमध्ये प्रत्येकी दोन आणि गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी आणि केरळमध्ये पाच जणांना समावेश आहे.
[read_also content=”धक्कादायक! भटिंडा मिलिटरी स्टेशनवर गोळीबार; चार जवान शहीद, तपास सुरू https://www.navarashtra.com/india/firing-at-bathinda-military-station-four-jawans-martyred-observed-by-helicopters-and-drones-nrps-383774.html”]
देशातील एकूण कोविड प्रकरणांची संख्या 4,47,76,002 वर पोहोचली आहे. गेल्या वर्षी 1 सप्टेंबर रोजी देशात 7,946 COVID-19 प्रकरणांची एक दिवसीय वाढ नोंदवली गेली. 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये XBB1.16 प्रकाराची 1,774 प्रकरणे आढळून आली आहेत. भारतीय SARS-CoV-2 Genomics Consortium (INSACOG) च्या डेटानुसार, 230 हून अधिक संक्रमित रुग्णांना XBB1.16.1, Omicron चे उत्परिवर्तित सब-व्हेरिएंट झाले आहे.