फोटो सौजन्य - सोशल मीडिया
यशस्वी जैस्वालचा कॅच वादग्रस्त : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना मेलबर्न येथे खेळला जात आहे. पाचव्या दिवशी यशस्वी जैस्वाल शानदार फलंदाजी करत होता, मात्र तिसऱ्या पंचाच्या निर्णयामुळे त्याला बाद घोषित करण्यात आले. जैस्वालच्या विकेटवर बराच गदारोळ पाहायला मिळत आहे. जयस्वालच्या विकेटबाबत तिसऱ्या पंचाच्या निर्णयावर टीम इंडियाचे माजी दिग्गज खेळाडूही संतापलेले दिसले. यशस्वी जैस्वालचा झेल सध्याच्या घडीला जगातील सर्वात वादग्रस्त झेलांपैकी एक बनला आहे, जिथे रियल टाइम कॉमेंट्रीमध्ये काहीही नसतानाही फील्ड अंपायरचा निर्णय बदलण्यात आला. सुनील गावस्कर यांनी तंत्रज्ञानाचा वापर करू नका, असे स्पष्टपणे सांगितले आहे.
India vs Australia : मेलबर्न कसोटी अनिर्णित राहिल्यास भारत WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडेल का?
ऑस्ट्रेलियासाठी डावातील ७१वे षटक टाकण्यासाठी पॅट कमिन्स आला तेव्हा जयस्वालने त्याच्या एका चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू थेट यष्टिरक्षक ॲलेक्स कॅरीच्या हातात गेला. ज्यावर ऑस्ट्रेलियन संघाने जोरदार अपील केले पण अंपायरने नॉट आऊट दिला. यानंतर कमिन्सने थर्ड अंपायरची मदत घेतली. तिसऱ्या पंचाने बराच वेळ तपासणी केली, अल्ट्रा एजमध्ये स्पाइक नसला तरी, जैस्वालच्या ग्लोव्हजवळून चेंडू गेल्यावर मागे गेल्यानंतर चेंडूचा कोन बदलला. त्यामुळे जयस्वाल याला बाद घोषित करण्यात आले.
Third Umpire giving the decision on Yashasvi Jaiswal. pic.twitter.com/HVYzaNkLlf
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 30, 2024
थर्ड अंपायरच्या या निर्णयामुळे भारतीय चाहते खूपच निराश दिसत आहेत. जयस्वाल यांनाही तिसऱ्या पंचाच्या निर्णयावर विश्वास बसत नव्हता आणि त्यांना निराश होऊन बाहेर जावे लागले.
स्टार स्पोर्ट्सवर कॉमेंट्री करताना सुनील गावस्कर म्हणाले की, “हा एक ऑप्टिकल भ्रम असू शकतो. जर तुमचा तंत्रज्ञानावर विश्वास नसेल, तर हे तंत्रज्ञान ठेवू नका. जर थर्ड अंपायरला मैदानावर उभ्या असलेल्या अंपायरचा निर्णय उलटवायचा असेल तर, मग त्याच्याकडे ठोस पुरावे असावेत.” त्याच वेळी, तिसऱ्या पंचाने सांगितले की, मी पाहतो की चेंडू हातमोजेला लागला आहे. जोएल (फील्ड अंपायर), तुम्हाला तुमचा निर्णय बदलावा लागेल.” अशा प्रकारे, यशस्वीला ८४ धावांची इनिंग खेळून पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.
जर यशस्वीला विचलनानुसार आऊट दिले गेले असेल, तर केएल राहुलला पर्थ कसोटी सामन्यात नाबाद द्यायला हवे होते. त्यावेळी चेंडू, बॅट आणि पॅड यांचा संपर्क होता. सिनिकोमध्ये थोडासा स्पाइक होता. त्यावेळी चेंडू प्रत्यक्षात बॅटला लागला होता किंवा बॅटचा पॅडशी संपर्क झाला होता, याचा ठोस पुरावा नव्हता. त्यावेळी चेंडू बॅटच्या अगदी जवळ आला होता.