फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : मेलबर्न येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. हा सामना जिंकण्यासाठी पाचव्या आणि शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 340 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात पुन्हा टीम इंडिया संकटात आहे. भारताच्या संघाने २६ ओव्हर शिल्लक असताना आणि विजयासाठी २०८ धावांची गरज असताना टीम इंडियाने सहा विकेट्स गमावले आहेत. लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली आणि अवघ्या ३० धावांत टीम इंडियाने ३ मोठे विकेट गमावले.
दोन्ही संघासाठी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा चौथा सामना फार महत्वाचा आहे. मेलबर्न कसोटी जिंकण्यासाठी दोन्ही संघ सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी टीम इंडियासाठी हा मॅच जिंकणं खूप महत्त्वाचं आहे, पण आता मोठा प्रश्न असा आहे की हा टेस्ट मॅच ड्रॉ झाला तर टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडेल का? यासंदर्भात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या गुणतालिकेचे समीकरण सध्या कसे आहे यावर एकदा नजर टाका.
टीम इंडिया मेलबर्न टेस्ट जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, पण जर हा सामना अनिर्णित राहिला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे पॉइंट टेबल काय असणार आहे? वास्तविक, पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये पोहोचला आहे.
आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात युद्ध सुरू आहे. दुसरीकडे, मेलबर्न कसोटी अनिर्णित राहिल्यास टीम इंडियाचे केवळ ५४.६३ टक्के गुण असतील आणि भारतीय संघ डब्ल्यूटीसी फायनलच्या शर्यतीत राहील, परंतु टीम इंडियाच्या पुढे अनेक अडचणी निर्माण होणार आहेत. यानंतर टीम इंडियाला सिडनी टेस्ट कोणत्याही किंमतीत जिंकायची आहे.
INDIA’S QUALIFICATION SCENARIO FOR WTC FINAL:
– If MCG test ends in a draw.
– SCG Test is a must win match.
– Then Australia shouldn’t win both games against Sri Lanka.(India can qualify even if BGT ends in 1-1 but then SL should win the series 1-0 which is impossible as… pic.twitter.com/nHES7YEgfn
— Johns. (@CricCrazyJohns) December 29, 2024
सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या पॉइंट टेबलमध्ये दक्षिण आफ्रिका पहिल्या स्थानावर आहे. याशिवाय ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर तर टीम इंडिया तिसऱ्या स्थानावर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनचा अंतिम सामना टॉप-2 संघांमध्ये होणार आहे. अशा स्थितीत टीम इंडियाला दुसऱ्या क्रमांकावर राहायचे आहे, त्यासाठी ऑस्ट्रेलियाचा पराभव आवश्यक आहे.