सोशल मीडियाचा(Social Media) योग्य वापर करणाऱ्या गायक-कलाकारांसाठी हे माध्यम जागतिक पातळीवर त्यांच्या कलागुणांना वाव देणारं मोठं प्लॅटफॅार्म ठरत आहे. यु ट्यूब, फेसबुक, ट्विटर, टिक टॅाकच्या माध्यमातून आजवर बऱ्याच कलाकारांनी आपलं कौशल्य जगासमोर ठेवत कौतुकाची थाप मिळवली आहे. आजवर प्रसिद्धीझोतापासून अलिप्त असलेल्या अशाच एका गायिकेनं मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. योहानी(Manike Mage Hithe Fame Yohani) या तरुण श्रीलंकन गायिकेच्या एका गाण्यानं अबाल वृद्धांनाच नव्हे, तर गायक-संगीतकारांनाही अक्षरश: वेड लावलं आहे.
योहानीनं गायलेलं काहीसं हळूवार लयीतील ‘माणिके मागे हिते…’ हे मूळ सिंहली भाषेतील गाणं आता जवळपास सर्वच प्रादेषिक भाषांमध्ये बनलं आहे. अल्पावधीत योहानीला मिळालेल्या या प्रसिद्धीची दखल बॅालिवूडनंही घेतली आहे. योहानीला बॅालिवूडमध्ये डेब्यू करण्याची संधी मिळाली आहे. या गाण्याच्या अधिकृत स्पेशल हिंदी व्हर्जनचा समावेश ‘थँक गॅाड’ या चित्रपटामध्ये करण्यात येणार आहे.
[read_also content=”‘या’ वस्तूंशिवाय तुमची करवा चौथची पूजा राहिल अपूर्ण, अधिक माहिती जाणून घ्या https://www.navarashtra.com/religion-news-marathi/karwa-chauth-2021-things-used-in-karwa-chauth-puja-nrsr-194572/”]
रश्मी विराग यांनी लिहिलेलं हिंदी गाणं संगीतकार तनिष्क बागची संगीतबद्ध करणार आहे. इंद्रकुमार दिग्दर्शित ‘थँक गॅाड’मध्ये अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रित सिंग मुख्य भूमिकेत आहेत. हे गाणं सिद्धार्थ आणि नोरा फतेही यांच्यावर चित्रीत करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.






