पुणे : पुण्यात दिवसेंदिवस गन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्याच्या (Pune) दापोडीत दुहेरी हत्याकांड (Double Murder Case) उघडकीस आलं आहे. एका माथेफिरु आरोपीने एका दाम्पत्याची निर्घुण हत्या केली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. एवढ्यावरच न थांबता आरोपी रक्ताने माखलेला टिकाव घेऊन रस्त्यावर फिरत होता. शंकर नारायण काटे (वय- 60) आणि संगीता काटे (वय- 55) अशी हत्या झालेल्या पती-पत्नींची नावे आहेत. तर, प्रमोद मगरुडकर (वय- 47) या आरोपीला भोसरी पोलिसांनी (Bhosari Police) ताब्यात घेतले आहे.
[read_also content=”प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! मुंबई -पुणे एक्स्प्रेसवर दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत वाहनांना बंदी, ‘हे’ आहे कारण https://www.navarashtra.com/latest-news/vehicles-banned-on-mumbai-pune-express-from-12-noon-to-3-pm-due-to-some-work-nrps-369152.html”]
ही दुहेरी हत्याकांडाची ही घटना शनिवारच्या रात्री दहा वाजता घडल्याची माहिती समोर आली आहे. दापोडीत काटे दाम्पत्यावर टीकावाने घाव घालून दुहेरी हत्या करण्यात आली आहे. काटे दाम्पत्य हे त्यांच्या घरात बसले होते. तेव्हा, आरोपी प्रमोद त्यांच्यावर टिकावाचे घाव घातले. मात्र, अद्याप या दुहेरी हत्येचे कारण समजू शकेलेले नाही. आरोपी प्रमोद हा हत्या करून रक्ताने माखलेला टिकाव घेऊन रस्त्यावर फिरत होता. हे पाहून नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ येऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे. प्रमोद हा नुकताच दिल्लीवरून आल्याचीही माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली.