काही दिवसापुर्वी पुष्कर जोग दिग्दर्शित ‘मुसाफिरा’ चित्रपटाचे नवीन पोस्टर आणि त्यानंतर मनाला भिडणारे ‘मन बेभान’ असे गाणे प्रदर्शित झाले. ज्याला प्रक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. आता पुष्कर जोग दिग्दर्शित ‘मुसाफिरा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेला भारतातील पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट 2 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.
[read_also content=”हृतिक आलियानंतर, उर्मिला मातोंडकरने केलं 12वी फेलचं कौतुक; म्हणाली..उफ्फ हा चित्रपट… https://www.navarashtra.com/movies/urmila-matondakar-praise-12th-fail-movie-vikrant-massey-nrps-499533.html”]
रियुनियनच्या निमित्ताने भेटलेले हे पाचही मित्र एका अनोख्या दुनियेची सफर करताना दिसत आहेत. आयुष्यात आलेले, येणारे चढउतार या सगळ्यांना सामोरे जाऊन कुठेतरी स्वतःसाठी जगताना ते दिसत आहेत. मैत्री म्हटल की, त्यात प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, भांडण या सगळ्या गोष्टी येतात. या सफरीचा मनमुराद आनंद लुटताना हे पाचही मित्र धमाल करणार आहेत. हा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाणार, हे पाहण्यासाठी आपल्याला २ फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स, ऐश मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने, नितीन वैद्य प्रोडक्शन आणि गुझबम्प्स एंटरटेन्मेंट प्रस्तुत ‘मुसाफिरा’ या चित्रपटात पुष्कर जोग, पूजा सावंत, पुष्कराज चिरपुटकर, स्मृती सिन्हा, दिशा परदेशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणाला, ‘’मुसाफिराच्या माध्यमातून मला प्रेक्षकांसाठी काहीतरी दर्जेदार करायचे होते. लॉकडाऊनच्या काळात सुचलेली माझी ही कथा चित्रपटात मांडण्याचा माझा हा प्रयत्न होता. मैत्रीची नवीन परिभाषा या निमित्ताने अनुभवायला मिळणार आहे. आयुष्यात मैत्री किती महत्वाची हेही ‘मुसाफिरा’च्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले आहे. मैत्रीवर भाष्य करणारा हा चित्रपट एक कौटुंबिक चित्रपट आहे.’’