• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Pandurangacharani Sakade Of Deputy Chief Minister Devendra Fadnavis Nrab

बा.. विठ्ठला, शेतकरी, कष्टकरी वर्गाला सुजलाम सुफलाम कर..! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पांडुरंगाचरणी साकडे

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज पार पडली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते त्या दोघांचा हृद्य सत्कार करण्यात आला.

  • By Aparna
Updated On: Nov 04, 2022 | 11:55 AM
बा.. विठ्ठला, शेतकरी, कष्टकरी वर्गाला सुजलाम सुफलाम कर..! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पांडुरंगाचरणी साकडे
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पंढरपूर – गोरगरीब जनता, कष्टकरी व शेतकऱ्यांवर येणारी संकटे दूर होऊन तो सुजलाम सुफलाम व्हावा, यासाठी शक्ती आणि आशीर्वाद द्यावा, असे साकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित शासकीय महापुजेच्याप्रसंगी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री  फडणवीस व अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज पार पडली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते त्या दोघांचा हृद्य सत्कार करण्यात आला.

यावेळी महसूलमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, आमदार हरिभाऊ बागडे, बबनराव पाचपुते, सुभाष देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, पृथ्वीराज देशमुख, सुनील कांबळे, गोपीचंद पडळकर, राणा जगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अप्पर जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजीव जाधव, मंदिर समितीचे सदस्य उपस्थित होते.

अनेक आक्रमणे होत असतानाही वारकऱ्यांनी भागवत धर्माची पताका फडकवत ठेवली. वारीचा हा अभूतपूर्व सोहळा पाहणाऱ्याच्या डोळ्यांचे पारणे फिटते. हा सोहळा वृद्धिंगत व्हावा, अशी आपणा सर्वांची अपेक्षा आहे, असे सांगून फडणवीस म्हणाले, पंढरपूर वारीच्या सर्व परंपरा अखंडित ठेऊन वारकरी संप्रदायाची परंपरा पाळून, स्थानिकांना विश्वासात घेऊन, कोणाचेही नुकसान न करता, कोणालाही विस्थापित न करता, अधिग्रहीत केलेल्या जागेचा योग्य मोबदला संबंधितांना देऊन, पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतिम करण्यात येईल.

नामदेव पायरी ही एक अभूतपूर्व व्यवस्था आहे. त्याचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक येतात. त्यामुळे मंदिर जीर्णोद्धार व नामदेव पायरीचा विकास प्राधान्याने करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिल्याचे त्यांनी सांगितले. मंदिराच्या दुरुस्तीचे काम प्राधान्याने हाती घेण्यात येईल आणि आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री आणि भाविक पंढरीत येतील तेव्हा त्यांना हा बदल दिसेल, असा विश्वास व्यक्त करून पांडुरंगाच्या भक्तीत लीन होऊ या व भागवत धर्माची परंपरा, वारकरी प्रथा – परंपरा, भक्तीभाव पुढच्या अनेक पिढ्यापर्यंत पोहोचविण्याचे काम करूया, असे ते म्हणाले.

साळुंखे दांपत्य ठरले मानाचे वारकरी

शिरोडी खुर्द (ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) येथील उत्तमराव साळुंखे आणि कलावती साळुंखे हे दांपत्य मानाचे वारकरी ठरले. त्यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने एक वर्ष कालावधीचा मोफत प्रवासाचा पास सुपूर्द करण्यात आला. साळुंखे समाज कल्याण कार्यालयातून सेवानिवृत्त झाले असून, ते पन्नास वर्षापासून वारी करत आहेत. यावेळी मंदिर समितीच्या वतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत व लोकप्रतिनिधी व प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

मंदिर समिती सदस्या ॲड. माधवी निगडे यांच्या वेलफेअर फाऊंडेशनच्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र कथेवर आधारित ॲनिमेटेड फिल्मचे तसेच मंदिर समिती दैनंदिनी व श्रींच्या पुरातन अलंकारांच्या अल्बमचे प्रकाशन उपमुख्यमंत्र्यांच्याहस्ते यावेळी करण्यात आले. यावेळी बालवारकऱ्यांकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर महाराज यांनी केले. तर आभार विनया कुलकर्णी यांनी मानले.

श्री संत नामदेव महाराज वाड्याला भेट आणि दर्शन

श्री संत नामदेव महाराज यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी श्री संत नामदेव महाराज वाड्यात जाऊन दर्शन घेतले. मंदिर समितीच्यावतीने यावेळी त्यांचा पगडी व शाल देऊन तर अमृता फडणवीस यांचा साडी देऊन सत्कार करण्यात आला.

Web Title: Pandurangacharani sakade of deputy chief minister devendra fadnavis nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2022 | 11:54 AM

Topics:  

  • Amruta Fadanvis
  • devendra fadanvis

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Poco C85 5G vs Lava Play Max 5G: कोण जिंकणार यूजर्सचं मन? तुमच्या बजेटचा खरा हिरो कोण? खरेदी करण्यापूर्वी नक्की वाचा

Poco C85 5G vs Lava Play Max 5G: कोण जिंकणार यूजर्सचं मन? तुमच्या बजेटचा खरा हिरो कोण? खरेदी करण्यापूर्वी नक्की वाचा

Dec 10, 2025 | 07:48 PM
“मला Akshaye Khanna नेहमीच आवडतो, तो खूप क्यूट…”, ‘या’ अभिनेत्रीचा Video होतोय व्हायरल

“मला Akshaye Khanna नेहमीच आवडतो, तो खूप क्यूट…”, ‘या’ अभिनेत्रीचा Video होतोय व्हायरल

Dec 10, 2025 | 07:39 PM
गुटखा उत्पादन आणि विक्रेत्यांचा गेम होणार! CM देवेंद्र फडणवीसांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

गुटखा उत्पादन आणि विक्रेत्यांचा गेम होणार! CM देवेंद्र फडणवीसांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Dec 10, 2025 | 07:29 PM
”तुम्ही किती त्रास देणार..”, The Ba***ds Of Bollywood मधल्या प्रकरणावर Kranti Redkarची प्रतिक्रिया

”तुम्ही किती त्रास देणार..”, The Ba***ds Of Bollywood मधल्या प्रकरणावर Kranti Redkarची प्रतिक्रिया

Dec 10, 2025 | 07:04 PM
आम्हीच इकडचे बादशाह! नोव्हेंबर 2025 मध्ये ग्राहकांनी ‘या’ Cars घेतल्या डोक्यावर, विक्रीत मोठी वाढ

आम्हीच इकडचे बादशाह! नोव्हेंबर 2025 मध्ये ग्राहकांनी ‘या’ Cars घेतल्या डोक्यावर, विक्रीत मोठी वाढ

Dec 10, 2025 | 07:03 PM
Amit Shah on Congress: ‘नेहरूंनी PM बनणं ही पहिली ‘वोट चोरी…’ राहुल यांच्या आरोपांना अमित शाह यांचा थेट पलटवार

Amit Shah on Congress: ‘नेहरूंनी PM बनणं ही पहिली ‘वोट चोरी…’ राहुल यांच्या आरोपांना अमित शाह यांचा थेट पलटवार

Dec 10, 2025 | 07:02 PM
‘पत्रकारितेतील नव-प्रवाह’ पुस्तक प्रकाशित; आधुनिक माध्यमविश्वाची दिशा दाखवणारा संदर्भग्रंथ

‘पत्रकारितेतील नव-प्रवाह’ पुस्तक प्रकाशित; आधुनिक माध्यमविश्वाची दिशा दाखवणारा संदर्भग्रंथ

Dec 10, 2025 | 06:57 PM

व्हिडिओ

पुढे बघा
ई व्हेईकल धारकांसाठी आनंदाची बातमी; टोलची रक्कम परत मिळणार

ई व्हेईकल धारकांसाठी आनंदाची बातमी; टोलची रक्कम परत मिळणार

Dec 10, 2025 | 03:07 PM
पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

Dec 10, 2025 | 03:04 PM
तुकडेबंदी सुधारणा विधेयकामुळे होणार ६० लक्ष कुटुंबांची मालमत्ता कायदेशीर – चंद्रशेखर बावनकुळे

तुकडेबंदी सुधारणा विधेयकामुळे होणार ६० लक्ष कुटुंबांची मालमत्ता कायदेशीर – चंद्रशेखर बावनकुळे

Dec 10, 2025 | 02:59 PM
Mumbai : ‘त्या’ कथित व्हिडीओप्रकरणी आ. महेंद्र दळवींचा खुलासा; म्हणाले अंशतः जरी….

Mumbai : ‘त्या’ कथित व्हिडीओप्रकरणी आ. महेंद्र दळवींचा खुलासा; म्हणाले अंशतः जरी….

Dec 10, 2025 | 02:56 PM
Kalyan : कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाचा भव्य स्नेहमेळावा

Kalyan : कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाचा भव्य स्नेहमेळावा

Dec 10, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : एफ.आर.पी.ची रक्कम कमी निघावी म्हणुन कारखान्यांकडुन रिकव्हरीची चोरी – अजित नवले

Ahilyanagar : एफ.आर.पी.ची रक्कम कमी निघावी म्हणुन कारखान्यांकडुन रिकव्हरीची चोरी – अजित नवले

Dec 09, 2025 | 06:55 PM
Sangli News : पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घालत विचारला जाब,नागरिक आक्रमक

Sangli News : पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घालत विचारला जाब,नागरिक आक्रमक

Dec 09, 2025 | 06:21 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.