फोन नाही, हा तर पॉवरहाऊस! Realme आणतोय 10,001mAh बॅटरी असलेला ढासू स्मार्टफोन, या दिवशी भारतात होणार दमदार एंट्री
कंपनी त्यांचा पहिला 10,001mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन Realme P4 Power 5G या नावाने लाँच करणार आहे. या स्मार्टफोनबाबत कंपनीने त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर देखील माहिती शेअर केली आहे. 10,001mAh बॅटरी असलेला Realme P4 Power 5G स्मार्टफोन 29 जानेवारी रोजी भारतात लाँच केला जाणार आहे. हा स्मार्टफोन म्हणजे एका नव्या युगाची सुरुवात आहे, असं कंपनीने एक्स अकाऊंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये सांगितलं आहे. आतापर्यंत कोणत्याही कंपनीने 10,000mAh बॅटरी असलेला फोन भारतात लाँच केला नाही. त्यामुळे हा स्मार्टफोन भारतात एक नवीन क्रांती करणार यामध्ये कोणतीही शंका नाही. (फोटो सौजन्य – X)
This isn’t more Power. This is Power rewritten. 10001 mAh doesn’t raise the bar. It moves it so far ahead, no one’s catching up. realme P4Power Launching 29th Jan. Know More, Stay Tuned! pic.twitter.com/UgRH5xOS7T — realme (@realmeIndia) January 20, 2026
रियलमीने अधिकृतपणे ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन लिस्ट केला आहे. ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर या फोनचे मॅक्रो पेज देखील तयार करण्यात आले आहे. तथापी, कंपनीने या स्मार्टफोनच्या फीचर्सबाबत अद्याप कोणताही अधिकृत खुलासा केला नाही. येत्या काहीच दिवसांत या स्मार्टफोनचे फीचर्स देखील जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.
Realme P4 Power 5G स्मार्टफोन गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या Realme P4 सीरीजचा सर्वात पावरफुल स्मार्टफोन असणार आहे. कंपनीच्या आगामी फोनचे बॅटरी स्पेसिफिकेशन्स कंफर्म झाले आहेत. समोर आलेल्या रिपोर्टनुसार, या फोनची बॅटरी 1650 वेळा चार्ज केल्यानंतर देखील 80 टक्क्यांपर्यंत गुड कंडीशनमध्ये असणार आहे. या फोनच्या बॅटरीवर कंपनी 8 वर्षांची वॉरंटी देखील ऑफर करणार आहे. यामध्ये फास्ट वायर्ड चार्जिंगसह 27W रिवर्स चार्जिंग फीचर देखील मिळणार आहे. ज्यामुळे तुम्ही दूसरे फोन, स्मार्टवॉच, ईयरबड्स इत्यादी चार्ज करू शकता.
रियलमीच्या या आगामी फोनमध्ये 6.78 इंच मोठा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. आगामी फोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेट सपोर्ट असू शकतो. फोनमध्ये मीडियाटेक डेमेन्सिटी 7400 अल्ट्रा प्रोसेसर दिला जाऊ शकतो. याशिवाय या फोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज सपोर्ट दिला जाण्याची शक्यता आहे. हा आगामी फोन IP68, IP69 रेटेड असणार आहे, ज्यामुळे पाणी आणि धुळीपासून फोन खराब होणार नाही. या स्मार्टफोनच्या मागील बाजूला 50MP चा मुख्य आणि 8MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा दिला जाऊ शकतो. व्हिडीओ कॉलिंगसाठी या डिव्हाईसमध्ये 16MP कॅमेरा असू शकतो.
Ans: Realme हा मूळचा चिनी स्मार्टफोन ब्रँड आहे, परंतु भारतात मोठ्या प्रमाणावर उत्पादन व विक्री केली जाते.
Ans: होय. Realme चे अनेक स्मार्टफोन्स “Make in India” अंतर्गत भारतातच तयार केले जातात.
Ans: जास्त वेळ फोन वापरणारे, ट्रॅव्हलर्स, गेमिंग युजर्स, चार्जिंगची चिंता नको असणारे युजर्स






