पालखी महामार्गावर वृक्षलागवडीकडे दुर्लक्ष (फोटो- टीम नवराष्ट्र)
“वृक्षवल्ली आम्हा सोयरी” असा संदेश देणाऱ्या संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गावरच आज “वृक्षवल्ली आम्हा ना सोयरी” अशी भूमिका ठेकेदार कंपनीची असल्याची टीका होत आहे. पर्यावरण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा प्रशासन याकडे डोळेझाक करत आहेत काय, असा सवाल उपस्थित होत आहे. वेळेत व्यापक वृक्षलागवड, देखभाल आणि जबाबदारी निश्चित न झाल्यास हा महामार्ग विकासाचा नव्हे तर पर्यावरणीय ऱ्हासाचा प्रतीक ठरेल, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
महामार्गाचे काम धिम्या गतीने
संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम लिमटेक पर्यंत पूर्ण झाले आहे, मात्र लिपस्टिक पासून पुढे ठिकठिकाणी अर्धवट अवस्थेत आहे. संबंधित ठेकेदार कंपनी अत्यंत धीम्या पद्धतीने, या महामार्गाचे काम करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. लिमटेक उड्डाणपूल, भवानीनगर येथील, तसेच सणसर या ठिकाणचे उड्डाणपूल अपूर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा या ठिकाणी होत आहे






