फोटो - नरेंद्र मोदी, ट्विटर
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच युक्रेन दौऱ्यावरून परतले आहे. काही दिवसांनी पंतप्रधान सिंगापूर दौऱ्यावर जाणार आहेत. त्याआधी भारत आणि सिंगापूरच्या वरिष्ठ मंत्र्यांची गोलमेज परिषद पार पडली. आज दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये या गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस पंतप्रधान मोदींच्या सिंगापूर दौऱ्याबद्दल देखील अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. दोन्ही देशाच्या अधिकाऱ्यांमध्ये यशस्वी चर्चा झाल्याचे सिंगापूरचे परराष्ट्र मंत्री विवियन बालकृष्णन यांनी सांगितले.
आज झालेल्या गोलमेज बैठकीत दोन्ही देशांमध्ये डिजिटल, कौशल विकास, आरोग्य सेवा अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. भारत आणि सिंगापूरमध्ये याआधी देखील एक गोलमेज बैठक झाली होती. आज झालेली बैठक ही दुसरी बैठक होती. पहिल्यांदा २०२२ मध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळेस सिंगापूरचे उपपंतप्रधान लॉरेंस वोंग हे भारत दौऱ्यावर आले होते.
सिंगापूरचे विदेश मंत्री विवियन बालकृष्णन म्हणाले की, आजच्या बैठकीत झालेल्या चर्चेत सेमीकंडक्टर्स आणि इतर अनेक गोष्टींबाबत सहकार्य वाढवण्याबाबत भर देण्यात आला. सेमीकंडक्टर्स क्षेत्रात भारत विस्तार करू इच्छित आहे असे विदेशमंत्री विवियन बालकृष्णन म्हणाले. येणाऱ्या काळात हवाई क्षेत्रात भारतात अधिक प्रगती पाहायला मिळेल. मागच्या वर्षी भारताने १००० पेक्षा अधिक विमानांची ऑर्डर दिली आहे.
Strengthening our Strategic Partnership and making India-Singapore relations future ready.
Highlights of my visit to Singapore 🎥 :
🇮🇳 🇸🇬 pic.twitter.com/luoV6Y9jRH
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) August 27, 2024
सिंगापूर आणि भारताच्या अधिकाऱ्यांमध्ये आज गोलमेज बैठक पार पडली. या बैठकीला सिंगापूरचे नेतृत्व उपपंतप्रधान आणि व्यापार व उद्योग मंत्री किम योंग, कायदा मंत्री के. षनमुगम आणि अन्य वरिष्ठ मंत्र्यांनी केले. तर भारताकडून अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, मंत्री पियुष गोयल, मंत्री अस्विनी वैष्णव यांनी सहभाग घेतला होता.