मुंबई: घाटकोपरच्या एन विभागातील केशव बळीराम हेडगेवार उद्यानातील प्रस्तावित अमर महल ते वडाळा आणि पुढे परेलपर्यंत होणाऱ्या जलबोगदयाच्या (Water Tunnel) कामासाठी ७ झाडे कापावी(7 tree) लागणार आहेत. त्याबदल्यात १७ झाडे पुन्हा लावावी लागणार आहेत. ही झाडे कापण्याचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समिती समोर मंजुरीसाठी आला आहे.
[read_also content=”ताैत्के चक्रीवादळासाठी मुंबई सज्ज – कशी करण्यात आली तयारी जाणून घ्या एका क्लिकवर https://www.navarashtra.com/latest-news/mumbai-is-ready-for-tauktae-cyclone-boats-came-back-and-sea-link-is-closed-nrsr-129372.html”]
मात्र शुक्रवारी वृक्ष प्राधिकरणाची सभा होऊ शकली नाही. ती रद्द करण्यात आली.त्यामुळे विषय पत्रिकेसमोरील हा एकमेव विषय सुद्धा प्रलंबित राहिला आहे. हेडगेवार उद्यानात एकूण ८२ झाडे आहेत. यापैकी जलबोगदयाच्या कामात नारळाचे १ झाड , पेलट्रोफोरमची ४, गुलमोहर १ आणि लिंबाचे एक मृत झाड अशी ७ झाडे कापायची आहेत.