शाकिब अल हसनने मागितली देशवासियांची माफी; अखेरच्या सामन्यासाठी चाहत्यांना केले आवाहन
Shakib Al Hasan : बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनच्या समस्या संपण्याचे नाव घेत नाही. कालच त्याने टेस्ट करिअरमधून निवृत्ती जाहीर केली होती. बांगलादेशची राजकीय परिस्थिती गेल्या काही दिवसांपासून अत्यंत खराब सुरू होती. त्यामध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या पक्षाचा खासदार राहिलेला शाकिब अल हसन याच्यावर खुनाचा गुन्हा देखील दाखल झाला होता. आज तर बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष फारुख अहमद यांनी स्पष्ट केले आहे की, दिग्गज अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनविरुद्ध देशात सुरू असलेल्या खटल्यांमुळे बोर्ड त्याच्या वैयक्तिक सुरक्षेची खात्री देऊ शकत नाही.
टेस्ट करिअरमधून अचानक निवृत्ती
कालच शाकिब अल हसन (वय -37 वर्षे) टेस्ट करिअरमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तत्काळ प्रभावाने निवृत्ती जाहीर केली. यासोबतच त्याने सांगितले की, मायदेशी परतल्यावर सुरक्षेची हमी मिळाल्यास ऑक्टोबरमध्ये घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा निरोपाचा कसोटी सामना खेळायला आवडेल.
बांगलादेश बोर्डाचे अध्यक्ष काय म्हणाले
बांगलादेशी वृत्तपत्रानुसार फारुख अहमद म्हणाले, शाकिबची सुरक्षा बोर्डाच्या हातात नाही. मंडळ कोणत्याही व्यक्तीला वैयक्तिक सुरक्षा देऊ शकत नाही. परत येण्याचा निर्णय त्यांच्यावर अवलंबून आहे. त्यांच्या सुरक्षेचा विचार सरकारच्या उच्च स्तरावरून व्हायला हवा. BCB ही पोलिस किंवा रॅपिड ॲक्शन बटालियनसारखी सुरक्षा एजन्सी नाही. त्याच्याबद्दल आम्ही कोणाशीही (सरकारमध्ये) बोललो नाही. त्याची केस कोर्टात प्रलंबित आहे, त्यामुळे आम्ही त्याबद्दल फार काही करू शकत नाही.’
एका खुनाच्या प्रकरणात शाकिबचे नाव
बांगलादेशातील राजकीय अशांततेच्या काळात एका खुनाच्या प्रकरणात शाकिबचे नाव होते. राजकीय अस्वस्थतेमुळे पंतप्रधान शेख हसीना यांना पायउतार व्हावे लागले. शाकिब हा त्याचा पक्ष अवामी लीगचा खासदार होता. शाकिबने गुरुवारी सांगितले की, जर त्याच्या घरच्या बोर्डाने त्याच्यासाठी घरच्या मैदानावर निरोपाचा सामना आयोजित केला नाही, तर भारताविरुद्धचा दुसरा सामना हा त्याचा शेवटचा कसोटी सामना असेल.
पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तो संघाचे प्रतिनिधित्व करेल अशी शक्यता आहे. फारुख म्हणाला, ‘घरच्या मैदानावर शेवटचा सामना खेळला तर यापेक्षा काहीही चांगले होणार नाही. शाकिबला कठीण प्रसंगांचा सामना करावा लागत आहे. मी त्याच्याशी निवृत्तीबद्दल बोललो नाही. निवृत्तीची हीच योग्य वेळ आहे, असे त्यांचे मत असेल, तर मी त्यांच्या निर्णयाचा आदर करतो.