सध्या नव्या नव्या मालिका प्रेक्षकांच मनोरंजन करत आहेत. आता कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना नवी मालिका पाहायला मिळणार आहे. “ सुख कळले” (sukh kalale ) असं या मालिकेचं नाव असुन त्याचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या मालिकेत मराठी सिनेसृष्टीतील दोन गुणी कलाकार एकत्र काम करत आहे. रसिकांची लाडकी अभिनेत्री स्पृहा जोशी (Spruha Joshi) आणि चोखंदळअभिनेता सागर देशमुख (Sagar Deshmukh). मालिकेचा टिझर प्रेक्षकांच्या पंसतीस उतरला असुन प्रेक्षकांमध्ये चांगलाच उत्साह पाहयला मिळत आहे.
[read_also content=”रेस्टॉरंटमध्ये मोफत हलीम खाण्यासाठी गेल्यावर मिळाला लाठ्यांचा मार, हैदराबादच्या रेस्टॉरंटमध्ये उडाल एकच गोंधळ! https://www.navarashtra.com/india/hyderabad-malakpet-restaurants-for-haleem-offers-police-lathicharge-on-crowd-514966.html”]
ही मालिका कधी सुरु होणार, हे गुलदस्त्यात असले तरी या पहिल्याच सुंदर टीजरने रसिकांना सुखद धक्का दिला असून प्रेक्षकांच्या भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. स्पृहा जोशी आणि सागर देशमुख हे दोन्ही तगडे कलाकार प्रथमच एकत्र येत असून ही दमदार जोडी लोकांच्या पसंतीस उतरते आहे. “सुख कळले” ही एक वास्तवदर्शी मालिका असून स्पृहा- सागर आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवायला पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत.
प्रोमोमधील तरल भावस्पर्शी क्षण या दोघांमधील नाते अधोरेखित करत आहे. त्यामुळे ही एक मध्यमवर्गीय कुटुंबाची हृदयस्पर्शी कहाणी असून जी प्रेक्षकांना तुफान भावत आहे.