गेल्या अनेक दिवसापासुन बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) चर्चेत आहे. 200 कोटींच्या लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundering case) तिचं नाव समोर आलं होतं. तेव्हापासून तिच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. काही दिवसापुर्वी तुरुंगात असलेला तिचा कथित प्रियकर सुकेश चंद्रशेखर ( Sukesh Chandrasekhar ) तिला तुरुंगातून पत्र लिहीत धमकावत असल्याची तिनं दिल्ली पोलीसात तक्रार केली होती. आता पुन्हा तिच्या मागची डोकेदुखी वाढल्याचं दिसत आहे. सुकेशनं पुन्हा एकदा तिला पत्र लिहिलं आहे. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने सुकेश चंद्रशेखर यांनी जॅकलिन फर्नांडिससाठी एक हे पत्र लिहिलंय. आपल्या प्रेमपत्रात जॅकलिनला एक गाणं समर्पित केलं असुन एका ‘गोल्ड-डिगर’ने त्याला तिच्याविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न केल्याचही म्हण्टलं आहे.
[read_also content=”मालकाच्या जेवणात गुुंगीचं औषध टाकलं, 2.50 कोटींचे हिरे चोरून नौकरांनी बिहार गाठलं; मात्र आधार क्रमांकनं केला भांडाफोड! https://www.navarashtra.com/crime/2-servant-stole-diamond-of-rs-2-50-crore-from-onwer-house-in-mumbai-nrps-508685.html”]
सुकेश चंद्रशेखर यांनी प्रेमपत्रात लिहिलं की, बेबी, ‘मला तुझी खूप आठवण येते, व्हॅलेंटाईन वीकच्या पहिल्या दिवसापासून मी प्रत्येक क्षणी फक्त तुझ्याबद्दलच विचार करतोय. हा आमची दुसरी व्हॅलेंटाईन आहे, आपण एकमेकांपासून खूप दूर आहोत, पण आता तसं होणार नाही. हे वर्ष आपलं वर्ष आहे, जे आपल्या सभोवतालच्या सर्व नकारात्मकता आणि अडथळे दूर करणार आहे. माणूस चुकतो. यानंतर हृदय आणि मन वेगवेगळे सल्ले देतात, पण शेवटी मन जिंकतं. तसेच त्याने ‘मान मेरी जान…’ हे गाणंही जॅकलिनला समर्पित केलं.
दरम्यान त्यानं पत्रात एका गोल्ड डिगरचा उल्लेख केला. त्यानं म्हण्टलं की, गेल्या काही दिवसांत, आमच्या ओळखीचे अनेक लोकं घडलेल्या प्रकारावर हसत होते. एक गोल्ड डिगर देखील माझ्यासोबत झालेल्या प्रकारवर हसत होती, मला अप्रत्यक्ष संदेश देखील पाठवत होती, मला तुझ्या विरोधात भडकावत होती.
या गोल्ड डिगरला मला एक छोटासा संदेश द्यायचा आहे. प्रिय गोल्ड डिगर, तुम्ही आणि तुमच्या सहकाऱ्यांनी याआधीही माझ्या आणि जॅकीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, पण तो अयशस्वी झाला. आता या वाईट काळात तुम्ही पुन्हा एकदा प्रयत्न केला, यावेळी तुम्ही लोकांसाठी तो फारसा अयशस्वी झाला.