The Work Of Sand Smugglers The Whole River Wainganga Was Washed Away Is The Revenue Department Asleep Nrat
वैनगंगा नदीचे अख्खे पात्रच खरवडून नेले; महसूल विभाग झोपेत आहे का?
तुमसर (Tumsar) तालुका मुख्यालयापासून केवळ आठ किलोमीटर अंतरावर माडगी येथील वैनगंगा नदीपात्र (The Wainganga river) रेती तस्करांनी अक्षरश: पोखरून टाकले आहे. उत्खनन केलेल्या रेतीचा स्मशानघाट परिसर व गावाच्या प्रवेशद्वाराजवळच साठा केला आहे. पोखरलेल्या नदीपात्रामुळे (the pond) गावाला पुराचा धोका (risk of floods) निर्माण झाला आहे.