पुणे : पुणे शहर पोलीसांमध्ये (Pune City Police) मागील अनेक दिवसांपासून बदलीसत्र सुरु आहे. दरम्यान आता पुण्याच्या पोलीस आयुक्तांची बदली (Pune CP Transfer) करण्यात आली आहे. पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार (Ritesh Kumar Transfer) यांची बदली झालेली आहे. मागील वर्षभरामध्ये रितेश कुमार यांनी मोक्काच्या व स्थानबद्धतेच्या धडाकेबाज कारवाई करत शहरातील कुख्यात गुंड्यावर वचक बसवला होता.
आगामी लोकसभा निवडणूकीच्या (Lok Sabha elections 2024) पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुणे शहर पोलिसांमध्ये अनेक बदल्या झाल्या आहेत. राज्यातील १७ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे शहर पोलिसांच्या आयुक्त रितेश कुमार यांची बदली करण्यात आली आहे. अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांची पुण्यातील नवे पोलिस आयुक्त (New Pune CP ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सप्टेंबर २०२० सालापासून अमितेश कुमार यांची नागपूर पोलीस आयुक्त म्हणून निवड करण्यात आली होती. नागपूरच्या इतिहासात सर्वाधिक काळ पोलीस आयुक्तपदी राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. नागपूर पोलिस आयुक्त (Nagpur Police Commissioner) पदाची धुरा सांभाळलेल्या आयपीएस अमितेश कुमार यांची पुणे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.