कोकणातील शिंदे गटाच्या दोन नेत्यांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा
Kokan Politics: राज्यात येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाह महायुती म्हणून लढवणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच जाहीर आहे. त्याचप्रमाणे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनीदेखील तशाच घोषणा केल्या. पण तळ कोकणात चित्र मात्र काही वेगळचं दिसत आहे. कोकणात महायुतीतील तिन्ही पक्षांची तोंडे विरूद्ध दिशेला पाहायला मिळत आहे. रत्नागिरीत शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये मतभेद निर्माण झाले आहे. भाजपने स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. तर पालकमंत्री उदय सामंत आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीदेखील मोठी घोषणा केली आहे. ‘महायुतीत कार्यकर्त्यांना न्याय न मिळाल्यास आमचा मार्ग वेगळा असेल’ असा इशारा भाजपला दिला आहे. त्यामुळे कोकणात महायुतीत मिठाचा खडा पडल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
चिपळुणमधील अतिथी सभागृहात नुकतीच रत्नागिरी जिल्हा शिवसेना कार्यकारिणीच्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी ही घोषणा केली. स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुका महायुतीतून लढवायच्या आहेत. शिवसेना अध्यक्ष एकनाथ शिंदे आणि नेते निर्णय घेतली, मात्र जिल्ह्यात सन्मानजनक युती झाली नाही, तर सन्मान कसा मिळवायचा हे आपल्याला माहिती आहेत. कार्यकर्त्यांना न्याय न मिळाल्यास आमचीही स्वबळाची तयारी आहे. एकतर्फी निवडणूक जिंकण्याची आणि स्वबळावर लढण्याची आमची ताकद असल्याचा दावा योगेश कदम यांनी केला आहे.
Shibu Soren passes away: मोठी बातमी! झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन
यावेळी बोलताना पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी महायुतीसोबत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात आपण भाजप पदाधिकारी आणि राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांच्याशी चर्चाही केली आहे. आजची कार्यकारिणीची बैठक सदस्य नोंदणीसाठी होती. निवडणुकांच्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यात किमान ५० हजार सदस्य नोंदणी झाली पाहिजे. रत्नागिरीत आणि दापोलीत सदस्य नोंदणीला चांगला प्रतिसाद आहे. गुहागरमध्ये मात्र याची संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसात गुहागरमध्येही सदस्य नोंदणी वाढवावी, असे आदेश सामंतांकडून देण्यात आलेत.
तर योगेश कदम म्हणाले की, तळकोकणातून जर कोणी स्वबळाछी भाषा करत असेल तर आम्हीदेखील स्वबळावर लढण्यासाठी तयार आहोते. एकतर्फी जिंकण्याची आमचीही तयारी आहेत. एकनाथ शिंदे देतील तो आदेश पाळला जाईल, पण कोणी आमच्या कार्यकर्त्यांना लक्ष करणार असेल तर तो होऊ देणार नाही. चिपळून प्रमाणे गुहागरमध्येही आपले आमदार असायला हवेत. तिन्ही मतदारसंघात जास्तीत जास्त सभासदांची नोंदणी व्हावी यसाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा. तसेच यावेळी योगेश कदम यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांवरही भाष्य केलं.’ मला अनेक शिवसैनिकांचे फोन आले असून ते माझ्या पाठिशी आहेत, मला काहीही होऊ देणार नाही, अस कार्यकर्त्यांनी म्हटल्याचे कदम यांनी सांगितलं.
शिवसेनेचे सचिव किरण पावसकर म्हणाले की, ‘आता शिवसेना पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकाही निवडणुकीच्या माध्यमातून होणार आहेत. सदस्यांचे मतदान घेऊन पदाधिकारी निवडण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यामुळे जास्तीत ज्सात सदस्यांची नोंदणी करा, यामुळे आपल्यालाच फायदा होईल.