फोटो सौजन्य - Social Media
‘मेरे रश्के कमर’, ‘देखते देखते’, ‘ सांसो कि मला पर’ अशा गाण्यांनी जवळजवळ सगळ्याच पिढीच्या मनावर राज्य करणारे उस्ताद नुसरत फतेह अली खान यांना संगीताच्या दुनीतेंतील राजामाणूस म्हणून म्हंटले जाते. पाकिस्तानच्या मातीत जन्माला आलेले परंतु प्रत्येक भारतीयांच्या मनावर राज्य करणारे उस्ताद नुसरत फतेह अली खान यांचा संगीत वारसा सध्या राहत फतेह अली खान जपत आहेत. उस्ताद यांनी नव्वदचा दशक गाजवला आहे. फक्त ९० नव्हे तर त्यानंतरच्या सगळ्याच दशकात त्यांचे गाणे गाजले आहे.
कव्वाली असो वा गजल किंवा सुफी, उस्ताद यांच्या आवाजातून आलेले कोणतेही लयबद्ध काव्य हिट तर होतच. भारतात उस्ताद आणि त्यांच्या मंडळींची बरेच चाहते आहेत. अशा मध्ये गायक सागर भाटिया उस्ताद नुसरत फतेह अली खान यांचा वारसा भारतात जागृत ठेवत असल्याचे दिसून येत आहे. सागर भाटियाने अलीकडच्या काळात कव्वाली शैलीचे पुनरुत्थान केले आहे. विशेषत: त्याच्या सागर वाली कव्वालीने चाहत्यांची माने जिंकली आहेत.
सागरने त्याच्या यूट्यूब हॅन्डलवर त्याच्या सुफी अंदाज प्रस्तुत केला आहे. तसेच चाहत्यांनी त्याचा गायकीचा अंदाज पाहून सागरला उस्तादजी यांचा योग्य वारसदार म्हणून नेमला आहे. नवीन पिढीमध्ये उस्तादजी यांचे संगीत पेरण्याचे काम सागर करत आहे. सोशल मीडियावर त्याचे फार कौतुक केले जात आहे. त्याने सोशल मीडियावर फार मोठा चाहतावर्ग तयार केला आहे. चाहत्यांनी कॉमेंट्समध्ये त्यांचे भाव प्रकट केले आहेत. एका चाहत्याचे म्हणणे आहे कि “नुसरत उस्तादजी स्वर्गातून नक्कीच सागरचे हे बोल ऐकून आनंदित असतील”, तर काही जणांना सागरचे गीत ऐकून उस्तादजी यांची आठवण आली असल्याचे सांगितले आहे. सागरने “सादगी” या शीर्षकाखाली नुसरत साहबांना श्रद्धांजली अर्पण केली असता, एका श्रोत्याने टिप्पणी केली, “मी नुसरत साबांचे ऐकलेले सर्वोत्तम कव्हर आहे. तुमचा आवाज खरोखर जादुई आहे.” दुसऱ्याने लिहिले, “नुसरत साब यांना खरी श्रद्धांजली येथे मिळाली आहे.” तर आणखी एका चाहत्याने म्हटले, “आपण नुसरत साहेबांच्या सुरांची जादू अधिक गहिरी केली आहे.”
सागरने आपल्या कव्वाली संगीताने खऱ्या अर्थाने स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. उस्तादजी सारख्या उत्कृष्ट कलाकाराला आपल्या आवाजाच्या जादूने आणि संगीताच्या माध्यमातून त्याने आदरांजली वाहिली आहे. कलाकार कव्वाली शैलीला नवीन उंचीवर नेत आहे आणि त्याला मुख्य प्रवाहातील संगीत दृश्यात परत आणत आहे.