ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावं लागणार आहे. कारण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाण्याच्य पातळीमध्ये घट होत असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या एकूण धरण साठ्यात मागील वर्षीच्या तुलनेत ६ टक्के कमी पाणीसाठी शिल्लक आहे. या सातही धरणांमध्ये फक्त 1 लाख 76 हजार 026 दशलक्ष लिटर इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. परिणामी केवळ 41 दिवस पाणी पुरेल इतकाचा पाणीसाठी शिल्लक असल्याचे म्हटले जातं आहे.
पाणीकपातीचे कारण काय?
गेल्या महिन्यापासून काही जिल्ह्यात उष्णतेचा पारा वाढला आहे. या असह्य उष्म्यामुळे जनता हैराण झाली. या उष्णतेचा परिणाम धरणांतील पाणी साठ्यावर सर्वाधिक होत आहे. कारण या पाण्याचे बाष्पीभवन होऊन धरणातील पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट होते. त्याचा परिणाम ठाणे आणि उपनगरांतील शहरांना करण्यात येणाऱ्या दैनंदिन पाणी पुरवठ्यावर होतो.
[read_also content=”‘पोलीस महानालायक असतात…’, पुण्यातील पोर्शे गाडी अपघातावर केतकी चितळेचा हल्लाबोल, पाहा VIDEO https://www.navarashtra.com/movies/pune-porsche-accident-on-marathi-actor-ketaki-chitale-537131.html”]
एकीकडे उष्णतेची लाट आणि वाढत्या उष्णतेमुळे मुंबईकरांच्या अंगातून घामाच्या धारा निघत आहेत. तर दुसरीकडे ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलावर आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा कमी झाल्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली. यामुळे पाणीकपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण मुंबई महापालिका प्रशासनाकडून अद्याप पाणी कपातीचे कोणतेही संकेत दिले नाहीत. मात्र मुंबईकरांनी पाणी जपून वापरा, असे आवाहन वारंवार केले जात आहे.
मुंबईतील मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, मोडक सागर, भातसा, (मुंबई पाणीकपात) तानसा, विहार आणि तुळशी किंवा 7 धरणांतून दररोज 3950 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. अशावेळी मुंबईकरांची वार्षिक पाण्याची गरज भागवण्यासाठी 14 लाख 47 हजार 343 दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. मात्र गेल्या वर्षीच्या पावसामुळे मुंबईकरांसमोर पुन्हा जलसंकट निर्माण झाले आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा
अप्पर वैतरणा धरणामध्ये ११,७३० दशलक्ष लिटर, मोडक सागर धरणामध्ये २४,८९५ दशलक्ष लिटर, तानसा धरणामध्ये ४४,४०९ दशलक्ष लिटर, मध्य वैतरणा धरणामध्ये २१,०१२ दशलक्ष लिटर, भातसा धरणामध्ये ६४,२५८ दशलक्ष लिटर, विहार धरणामध्ये ७,१२७ दशलक्ष लिटर आणि तुळशी धरणामध्ये २,५९५ दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे.






