मुंबई : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींचा धाकटा मुलगा अनंत अंबानी हा शुक्रवारी, १२ जुलै रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये देदीप्यमान सोहळा समारंभात बालपणीची मैत्रीण राधिका मर्चंटशी विवाहबंधनात अडकला. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाचे कार्यक्रम सुरू आहेत. त्यात देशातील आणि जगातील जवळपास सर्वच मोठी नावे दिसत आहेत. भारतीय क्रिकेट संघाचे जवळपास सर्व खेळाडूही लग्नात दिसले होते. मात्र, विराट कोहली आणि रोहित शर्मासह अनेक नावे लग्नात दिसली नाहीत.
रोहित आणि विराट का होते अनुपस्थित
रोहित शर्मा अनंत आणि राधिकाच्या संगीत सोहळ्यात सहभागी झाला होता पण लग्नाला तो उपस्थित नव्हता. रोहित त्याच दिवशी विम्बल्डनच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दिसला होता. यानंतर रोहित अमेरिकेला गेला, जिथे त्याने त्याच्या अकादमीच्या कार्यक्रमात भाग घेतला. टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर मुंबईतील जल्लोषानंतरच विराट कोहली लंडनला रवाना झाला होता. पत्नी अनुष्कासोबत विराटची दोन मुलेही तिथे आहेत. तिथे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसोबत आनंद घेत आहे.
‘हे’ दिग्गज खेळाडूही दिसले नाहीत
अनंत आणि राधिकाच्या लग्नात रोहित शर्मा आणि विराट कोहलीशिवाय इतर अनेक मोठे भारतीय खेळाडू दिसले नाहीत. यामध्ये भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली, टीम इंडियाला टी-20 वर्ल्ड चॅम्पियन बनवणारा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, युवराज सिंग आणि हरभजन सिंगदेखील येथे दिसले नाहीत. हरभजनने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्वही केले आहे. युवी आणि भज्जी इंग्लंडमध्ये वर्ल्ड लिजेंड्स चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झाले होते. हा सामना बर्मिघम येथे सुरु होता, हा सामना युवीच्या नेतृत्वात भारताने जिंकला, त्यामुळे हे दिग्गज खेळाडून बर्मिंघमलाच अडलेले असलेले पाहायला मिळाले. ही ट्रॉफी आपल्या खेळाडूंनी जिंकल्याने अनेक खेळाडू आनंदात दिसत होते.
विराट-रोहित कधी दिसणार मैदानावर?
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. भारतीय संघाला पुढील मालिका श्रीलंकेत खेळायची आहे. तीन टी-२० आणि तितकेच एकदिवसीय सामने होतील. रोहित आणि विराट या दौऱ्यातही विश्रांती घेणार आहेत. यानंतर सप्टेंबरमध्ये भारताची बांगलादेशसोबत कसोटी मालिका आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही या मालिकेत खेळताना दिसणार आहेत.