मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही नेते एकत्र येण्याबाबत नेहमीच चर्चा होते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?, या प्रश्नावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आकाशाकडे बोट दाखवले. आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनीही परमेश्वराकडे बोट दाखवले आहे. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा केवळ मीडियात सुरू आहे.
निवडणुकीआधी आणि निवडणुकीनंतर अशी चर्चा होत असते, असेही सावंत यांनी स्पष्ट केले. अरविंद सावंत यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला. राज, उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा नेहमीच होतात. निवडणुकीच्या आधी आणि नंतरही या चर्चा होत असतात. आता मीडिया चर्चा करत आहेत, असे सांगत सगळ्याच गोष्टी भविष्यात बघितल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार का? असं विचारलं असता ठाकरे यांनी ‘परमेश्वरास ठाऊक’ अशा दोनच शब्दांत उत्तर दिलं. आत्ता सध्याचा काळ पाहता या प्रश्नांची उत्तरं नाहीत. इतर कुणाकडेही असतील असं वाटत नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.
[blockquote content=”राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? हा प्रश्नच मला आशावादी वाटत नाही. त्यांना हा प्रश्न का विचारण्यात आला?, त्यावर राज यांनी का उत्तर दिलं? हे त्यांनाच माहीत. आता यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच बोलू शकतात. तेच यावर निर्णय घेऊ शकतात, असे सांगतानाच समाजकारण आणि राजकारणात काहीही घडू शकते हे त्यांनाच माहित. ” pic=”” name=” – अरविंद सावंत, खासदार, शिवसेना”]
[read_also content=”बाईचं बाहेर लफड https://www.navarashtra.com/latest-news/immoral-relationships-do-not-mean-that-a-woman-is-not-a-good-mother-high-court-comment-nrvk-137069.html”]
[read_also content=”2051 पर्यंत… https://www.navarashtra.com/latest-news/after-a-few-days-man-will-not-be-able-to-live-on-earth-a-human-newborn-born-in-space-nrvk-136745.html”]
[read_also content=”डोस चुकला असता तर… https://www.navarashtra.com/latest-news/fathers-anguish-for-the-unborn-child-300-km-journey-by-bicycle-for-child-medicine-nrvk-136738.html”]