नवी दिल्ली : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा आयपीएल इतिहासातील असा संघ आहे ज्याने आजपर्यंत आयपीएलचे विजेतेपद पटकावलेले नाही, मात्र हा संघ नेहमीच चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतो. फॅन फॉलोइंगच्या बाबतीत आरसीबीचा संघ आघाडीवर आहे. आयपीएल २०२२, २६ मार्चपासून सुरू होणार आहे परंतु रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हा एकमेव संघ आहे ज्याने अद्याप आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केलेली नाही.
IPL २०२१ च्या उत्तरार्धापूर्वी विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याची पुष्टी केली असली तरी RCB ने अद्याप विराट कोहलीचा राजीनामा स्वीकारलेला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुन्हा एकदा विराट कोहलीकडे आरसीबीचे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते. वास्तविक, विराट कोहलीला पुन्हा कर्णधार बनवण्याची चर्चा जोर धरू लागली आहे कारण आरसीबीने ना राजीनामा स्वीकारला आहे ना कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे. विराट कोहलीला आरसीबीने १५ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले होते.
विराटने ‘द आरसीबी पॉडकास्ट’ मध्ये कर्णधारपद सोडण्याबाबत आयपीएलचा १५वा सीझन सुरू होण्याच्या एक महिना आधी सांगितले होते. विराट म्हणाला, ‘मी अशा प्रकारचा माणूस नाही जो काहीतरी धरून बसतो. जेव्हा मला असे वाटते की मी एखाद्या गोष्टीचा आनंद घेऊ शकत नाही, तेव्हा मी स्वतःला त्यापासून वेगळे करतो.
मी ते काम करू शकत नाही. गेल्या वर्षी कोहलीने चाहत्यांना अनेक धक्के दिले. आधी टीम इंडियाचे टी-२० चे कर्णधारपद सोडले आणि नंतर RCB ची कमान सोडली. नंतर विराटला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले आणि त्यानंतर विराटने कसोटीच्या कर्णधारपदाचाही राजीनामा दिला.
आयपीएलच्या इतिहासातील विराट कोहली हा एकमेव खेळाडू आहे जो अजूनही आयपीएलमध्ये एकाच संघाकडून खेळत आहे. विराट २००८ पासून आरसीबीचा भाग आहे. विराटने स्वतः एकदा सांगितले होते की जोपर्यंत विराट आयपीएलमध्ये खेळतो तोपर्यंत तो आरसीबीचा भाग राहील. विराट कोहलीने आतापर्यंत आयपीएलमध्ये आरसीबीकडून २०७ सामने खेळले आहेत. विराटच्या नावावर ३७.३९ च्या सरासरीने ६२८३ धावा आहेत. विराटने आयपीएलमध्ये ५ शतके आणि ४२ अर्धशतकेही केली आहेत.