Hardik Pandya Gets a Grand Welcome in Vadodara : ICC T-20 विश्वचषक 2024 जिंकल्यानंतर, स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचे वडोदरात जोरदार स्वागत करण्यात आले. त्याच्या चाहत्यांनी त्याचं जल्लोषात स्वागत केले. बार्बाडोसला परतल्यानंतर हार्दिक पांड्या दिल्लीला पोहोचला. येथे त्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. यानंतर मुंबईत टीम इंडियाची भव्य विजय परेड झाली. यामध्ये भारतीय संघाच्या चॅम्पियनची एक झलक पाहण्यासाठी हजारो लोक मरीन ड्राइव्हच्या रस्त्यावर उभे असल्याचे दिसले. विजयाची परेड पाहण्यासाठी इतके चाहते जमले होते की टीम इंडियाच्या बसला वानखेडे स्टेडियमपर्यंत पोहोचायला तास लागले.
हार्दिक पांड्याचे वडोदरामध्ये जल्लोषात स्वागत
#WATCH | Gujarat: Indian Cricketer Hardik Pandya receives a grand welcome as he visits his hometown Vadodara for the first time after India's T20 World Cup Victory. pic.twitter.com/kPKAYf00IA
— ANI (@ANI) July 15, 2024
विजयी रॅलीनंतर हार्दिक दिसला अनंत-राधिकाच्या लग्नात
विजय परेडनंतर हार्दिक पंड्या मुंबईत होता. यादरम्यान तो अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नातही दिसला होता. हार्दिक पांड्या लग्नात खूप मस्ती करताना दिसला. आता अनंत अंबानींच्या लग्नानंतर हार्दिकने वडोदरा गाठला.
हार्दिक पंड्याचे वडोदरात जल्लोषात स्वागत
हार्दिक पांड्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पहिल्यांदाच वडोदरा येथे पोहोचला होता. वडोदरातील लोकांनी त्यांच्या नायकाचे भव्य स्वागत केले. पांड्या हजारो चाहत्यांसमोर बसमध्ये उभा होता. बसवर ‘प्राइड ऑफ वडोदरा’ असे लिहिले होते.
हार्दिक पांड्याची वर्ल्ड कपमध्ये महत्त्वाची भूमिका
अनुभवी अष्टपैलू हार्दिक पंड्याने भारतीय संघाला टी-20 विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने आपल्या गोलंदाजीने अप्रतिम कामगिरी केली होती. 150 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करत पंड्याने 144 धावा केल्या आणि T20 वर्ल्ड कपमध्ये 11 विकेट्सही घेतल्या.
हार्दिकची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
30 वर्षीय हार्दिक पांड्याने आपल्या कारकिर्दीत एकूण 11 कसोटी, 86 एकदिवसीय आणि 100 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 532 धावा, एकदिवसीय सामन्यात 1769 धावा आणि T20 मध्ये 1492 धावा केल्या आहेत. 30 वर्षीय हार्दिक पांड्याने आपल्या कारकिर्दीत एकूण 11 कसोटी, 86 एकदिवसीय आणि 100 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 532 धावा, एकदिवसीय सामन्यात 1769 धावा आणि T20 मध्ये 1492 धावा केल्या आहेत. हार्दिक पांड्याच्या नावावर कसोटीत 17, एकदिवसीय सामन्यात 84 आणि T20 मध्ये 84 विकेट्स आहेत.