जगभरातील सर्वच महिलांना मासिक पाळी आल्यानंतर किंवा येण्यापूर्वी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मासिक पाळी आल्यानंतर होणाऱ्या वेदना, उशिरा मासिक पाळी येणे यामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. महिलांच्या शरीरात हार्मोन्समध्ये बदल झाल्यानंतर काही आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य वेळी उपचार केले नाहीत तर अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकता. PCOS ची समस्या किशोरवयीन मुली आणि तरुणींमध्ये जास्त प्रमाणात होते. हार्मोनल असंतुलित (hormonal imbalance) झाल्यानंतर मुख्यता ही समस्या उद्भवते. पीसीओएसचा त्रास जाणवू लागल्यानंतर वजन वाढण्यास सुरुवात होते. त्यामुळे या समस्येवर वेळीच उपाय करणे आवश्यक आहे.पीसीओएसचा त्रास जाणवू लागल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे. तसेच आहारात बदल केल्याने पीसीओएसचा त्रास कमी होतो.
[read_also content=”२० दिवसात वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल व्यायाम, सोप्या पद्धतीने वजनाचा काटा येईल खाली https://www.navarashtra.com/lifestyle/do-this-exercise-if-you-want-to-lose-weight-in-20-days-536025.html”]
पीसीओएस म्हणजे काय?
पीसीओएसला पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम असे म्हणतात. हा एक आजार नसला तरी यामुळे महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. या बदलांमुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. हार्मोनल असंतुलन झाल्याने पीसीओएसचा त्रास होण्यास सुरुवात होते. महिलांच्या शरीरातील पुरूष हार्मोन एंड्रोजनचे संतुलन बिघडते. यामुळे अनियमित पाळी येणे तसेच महिन्यातून एकदा किंवा दोनदा पाळी येते.
पीसीओएसची लक्षणे:
पीसीओएसचा त्रास कमी करण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचे सेवन करा:
ओट्स आणि बदाम मिल्क स्मूदी:
ओट्स आणि बदामांमध्ये प्रथिने, निरोगी चरबी, जीवनसत्त्वे आणि खनिजांसह इतर पोषक घटक आढळून येतात. पीसीओएसचा त्रास असलेल्या महिलांना आहारात ओट्स बदाम स्मूदीचा समावेश करा. ही स्मूदी बनवण्यासाठी सोपी आहे. तसेच रक्ततातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी बदाम स्मूदी मदत करते. नियमित दुधाच्या ऐवजी बदाम दूध पिल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते.
स्टार्च नसलेल्या भाज्या:
पीसीओएसचा त्रास जाणवू लागल्यानंतर स्टार्च कमी असलेल्या भाज्या आरोग्यासाठी चांगल्या आहेत. यामध्ये टोमॅटो, मशरूम, ब्रोकोली, मिरची, फ्लॉवर, सेलेरी, बडीशेपचा समावेश स्टार्च नसलेल्या भाज्यांमध्ये येतो.
मूग डाळ चिल्ला:
मूग डाळ चिल्ला आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि उच्च पोषक तत्वे असतात. चिल्ला बनवताना तुम्ही पालक, मूगडाळ, गाजर या पौष्टीक भाज्यांचा समावेश करू शकता. पालकमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात तर गाजर आणि मिरची या भाज्या अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असतात.
[read_also content=”प्रजननक्षमतेमध्ये पोषणाची महत्त्वपूर्ण भूमिका https://www.navarashtra.com/lifestyle/important-role-of-nutrition-in-fertility-536072.html”]
लीन प्रथिने:
शरीरामध्ये मांस पेशी टिकवून ठेवण्यासाठी आणि पोट भरलेले राहण्यासाठी आहारात कुक्कुट, मासे, टोफू, टेम्पेह, शेंगा आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा.