फोटो सौजन्य - Social Media
कंकशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौम्य मेंदूच्या आघाताचे (mTBI) निदान अधिक अचूक आणि त्वरित करता यावे यासाठी अॅबॉटने एक नवी लॅबवर आधारित रक्तचाचणी सादर केली आहे. Alinity i आणि Architect i1000SR उपकरणांवर आधारित ही चाचणी अपोलो हॉस्पिटल, हैदराबाद आणि न्यूबर्ग सुपरटेक लॅबमध्ये आधीपासूनच उपलब्ध आहे.
या रक्तचाचणीमुळे डॉक्टरांना केवळ १८ मिनिटांत विश्वासार्ह परिणाम मिळतात, ज्यामुळे तातडीने रुग्णाचे मूल्यांकन करता येते. या चाचणीच्या मदतीने सीटी स्कॅनची आवश्यकता तब्बल ४० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते, त्यामुळे आपत्कालीन विभागात रुग्णाचा वेळ आणि अनावश्यक रेडिएशनचा धोका कमी होतो. चाचणीमध्ये UCH-L1 आणि GFAP हे रक्तातील बायोमार्कर्स मोजले जातात, जे mTBI चे निदान करण्यासाठी उपयुक्त ठरतात.
अॅबॉट इंडियाचे जनरल मॅनेजर रवी सिंग यांनी सांगितले की, “ही रक्तचाचणी सीटी स्कॅनची गरज आहे की नाही, याचा निर्णय घेण्यास डॉक्टरांना त्वरित मदत करते. यामुळे रुग्ण आणि कुटुंबियांवरील मानसिक आणि आर्थिक ताण कमी होतो.” दरवर्षी भारतात जवळपास १० लाख लोकांना माइल्ड ट्रॉमॅटिक ब्रेन इंज्युरी होते. यात स्मरणशक्ती, हालचाल, समज आणि भावना यावर परिणाम होऊ शकतो. वेळेवर निदान आणि उपचार न मिळाल्यास दीर्घकालीन परिणाम संभवतात. विशेष म्हणजे, माइल्ड TBI झाल्यानंतर त्याच व्यक्तीस पुन्हा दुखापत होण्याचा धोका जास्त असतो.
ही चाचणी विशेषतः अशा ठिकाणी उपयुक्त ठरते, जिथे सीटी स्कॅन यंत्रणा उपलब्ध नाहीत. पारंपरिक पद्धतींपेक्षा ही रक्तचाचणी अधिक वेगवान, अचूक व सुरक्षित आहे. त्यामुळे मेंदूवर आघात झालेल्या रुग्णांना जलद निदान व उपचार मिळण्यास ही चाचणी मदत करणार आहे.