अंकिता लोखंडे ही केवळ एक उत्तम अभिनेत्री नाही तर स्टाईल आयकॉनदेखील आहे. ती एक उत्तम फॅशनिस्टा देखील आहे. अंकिता प्रत्येक लुक हा वेगळ्या पद्धतीने छान कॅरी करते यात शंका नाही. अंकिता नेहमीच स्टायलिश राहाते. बिग बॉसमध्येही तिच्या खेळासह तिने आपल्या फॅशनने सर्वांचे मन जिंकून घेतले होते. मराठमोळ्या अंकिताने घराघरात आपले चाहते निर्माण केले आहेत. तिचा फॅन बेसही प्रचंड आहे.
एखाद्या पार्टीपासून ते घरगुती कार्यक्रमापर्यंत कोणती स्टाईल कॅरी करायची असेल तर तुम्ही अंकिताच्या काही लुक्सवरून नक्कीच प्रेरणा घेऊ शकता. अंकिताचे काही कमालीचे लुक्स आम्ही खास तुमच्यासाठी या लेखाद्वारे आणले आहेत. पाहा अंकिताचे आकर्षक आणि मनमोहक लुक जे तुमचं मन मोहरून टाकतील. (फोटो सौजन्य – @lokhandeankita इन्स्टाग्राम)
राजेशाही थाट
उत्कृष्ट साड्यांबद्दलची अंकिताची आवड सर्वांनाच माहीत आहे. क्लासी केशरी बनारसी साडीत अंकिताचे सौंदर्य खुलून आले आहे. अंकिताच्या साड्यांचे कलेक्शन हे अत्यंत क्लासी असून ती नेहमीच उत्तमरित्या कॅरी करते.
[read_also content=”प्राजक्ता माळीच्या ब्लॅक सिल्व्हर साडीतील अदांनी काळजावर वार https://www.navarashtra.com/lifestyle/maharashtrachi-hasyajatra-fame-actress-prajakta-mali-looks-beautifully-gorgeous-in-black-silver-tanvastra-saree-latest-photos-540438/”]
फ्लोरल ब्युटी
अंकिताचा हा लुक रेट्रो झोनमधील दिसतोय. मोहक पांढऱ्या फुलांची ऑर्गेन्झा साडी तिने नेसली असून तिचा हा लुक रेट्रो फील देत आहे आणि या साडीत अंकिता सुपर ग्रेसफुल दिसतेय.
शिमरी लिलियाक स्टारलेट
अंकिता पेस्टल लिलाक ग्लिटरिंग साडीमध्ये आपला जलवा दाखवत आहे. तिच्या या ग्लॅम लुकमुळे चाहत्यांचे डोळे नक्कीच दिपतील. एखाद्या पार्टीसाठी तिचा हा लुक नक्कीच कॅरी करता येईल.
[read_also content=”भारतातील पारंपरिक साड्यांचा इतिहास https://www.navarashtra.com/lifestyle/history-of-famous-traditional-sarees-in-india-538462/”]
मिडनाइट ब्लू Diva
या जबरदस्त मिडनाईट ब्लू टसल गाउनसह अंकिता बोल्ड अँड ब्युटीफूल दिसत आहे. तिच्या या ड्रेसचा डीपनेक आणि फ्रील लुक अत्यंत स्टायलिश आणि सुपर लुक देतोय.
टसल इफेक्ट
अंकिताने या नीलमणी निळ्या रंगाच्या टेसल ड्रेसमध्ये ग्लॅमरस दिसतेय.तिचा हा फ्रील असणारा स्ट्रीप्ड पार्टी ड्रेस कमालीचा आकर्षक आणि ग्लॉसी दिसून येत आहे तर तिच्या ग्लॉसी मेकअपने त्यावर चारचाँद लावले आहेत.