फोटो सौजन्य: iStock
आपले पोट पुढे येणे हे कोणालाच आवडत नाही. खरंतर सगळ्यांनाच वाटते की आपले पोट आता राहावे आपण फिट दिसावे. जास्त वजन अनेकदा व्यक्तीचा आत्मविश्वास कमी करतो. तसेच, त्याच्या व्यक्तिमत्त्वावर नकारात्मक परिणाम करते. याशिवाय, एकदा वजन वाढले की, इतर अनेक आजारही शरीराला घेरतात. म्हणूनच प्रत्येकजण स्वतःला स्लिम आणि फिट ठेवू इच्छितो. हे साध्य करण्यासाठी लोक शक्य ते सर्व प्रयत्न करतात, मग ते जिममध्ये तासनतास व्यायाम असो किंवा योग्य आहार असो. पण कधीकधी काही छोट्या सवयींमुळे वजन वाढते. विशेषतः जेवणानंतर केलेल्या काही चुका. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
अपचनाची समस्या वाढली आहे? पोटात गॅस झाल्यानंतर शरीराच्या ‘या’ अवयवांमध्ये होतात तीव्र वेदना
बहुतेक लोकांना जेवणानंतर काहीतरी गोड खाण्याची सवय असते. खरंतर जेवणानंतर गुलाबजामुन, आईस्क्रीम किंवा कोणताही गोड पदार्थ मिळाले तर जेवणाची चव द्विगुणित होते हे आपण सर्वेच जाणतो. पण यामुळे तुमचे वजनही दुप्पट होऊ शकते. खरंतर, गोड पदार्थ खाल्ल्याने शरीराला अतिरिक्त कॅलरीज मिळतात, ज्यामुळे वजनही वेगाने वाढू लागते.
शरीर हायड्रेटेड राहण्यासाठी पुरेसे पाणी पिणे खूप महत्वाचे आहे. पण जेवणानंतर लगेच हे पाणी पिणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. बरेच लोक जेवणाच्या मध्ये आणि जेवणानंतर लगेच पाणी पितात, ज्यामुळे त्यांचे वजन वाढते. खरंतर, जेव्हा तुम्ही जेवणानंतर लगेच पाणी पिता तेव्हा पचन प्रक्रियेवर वाईट परिणाम होतो, ज्यामुळे शरीरात पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. म्हणून, जेवणानंतर किमान ३० मिनिटांच्या अंतराने पाणी प्यावे.
बदलत्या हवामानामुळे घसा खवखवतोय? आवाजात सतत बदल होतो? ‘हे’ घरगुती उपाय करून तात्काळ मिळवा आराम
जेवणानंतर लगेचच विश्रांती घेणे किंवा झोपणे याचाही पचन प्रक्रियेवर परिणाम होतो. खरंतर, जेव्हा आपले शरीर आरामदायी स्थितीत असते तेव्हा शरीराचे बहुतेक भाग सुस्त अवस्थेत जातात. या स्थितीत, पचनसंस्थेचे कार्य देखील मंदावते, ज्यामुळे अन्न योग्यरित्या पचत नाही आणि ते शरीरात चरबीच्या स्वरूपात जमा होऊ लागते. म्हणून, जेवणानंतर, किमान 30 मिनिटे कोणतीही शारीरिक हालचाल केल्यानंतरच झोपावे.
जेवणानंतर कोणत्याही प्रकारची शारीरिक हालचाल करणे योग्य जरी असले तरी याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही जेवणानंतर लगेच व्यायाम सुरू करा. खाल्ल्यानंतर लगेच तुम्ही थोडे फिरायला जाऊ शकता पण व्यायाम टाळा.
जेवणानंतर चहा किंवा कॉफी पिण्याची सवय अनेकांना असते. जर तुम्हीही अशा लोकांपैकी एक असाल तर आजच ही सवय बदला. विशेषतः जेवणानंतर चहा किंवा कॉफी पिणे टाळा.