रात्री पायांना तेल लाऊन मालिश करण्याचे काय आहेत फायदे
पायांचे तळवे शरीराचा सर्वात खालचा भाग आहेत आणि लोक त्यांची काळजी घेण्यात खूपच कमी पडतात. पाय दिवसभर इकडून तिकडे विविध प्रकारची घाण गोळा करतात आणि म्हणूनच त्यांची योग्य प्रकारे स्वच्छता करणे अधिक महत्त्वाचे आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का की रोज रात्री पायाच्या तळव्याला तेलाने मसाज केल्यास शरीराला एकच नाही तर अनेक फायदे होतात.
जर माहीत नसेल तर येथे जाणून घ्या रोज रात्री पायांच्या तळव्यांना मोहरीच्या तेलाने मालिश करण्याचे काय फायदे आहेत. आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे (फोटो सौजन्य – iStock)
मोहरीच्या तेलाचे फायदे
मोहरीच्या तेलात एकच नाही तर अनेक गुणधर्म आढळतात. हे तेल जीवनसत्त्वे आणि खनिजांचा विशेषतः चांगला स्रोत आहे. अगदी अनादी काळापासून आजीसुद्धा हे तेल वापरत आहेत. हिवाळ्यात झोपण्यापूर्वी तळव्यांना मोहरीच्या तेलाने मसाज केल्याने शरीराला महत्त्वपूर्ण फायदा मिळतो. तळव्यांना तेलाने मसाज करणे हे थेरपीसारखे आहे असे म्हणतात. तळव्यावर असे अनेक बिंदू आहेत जे तेल मालिश करताना दाबल्यास संपूर्ण शरीराला फायदा होतो. त्यामुळे याचा नियमित वापर करून फायदा करून घ्यावा
दररोज या तेलाने करा चेहऱ्याची मालिश, सर्व डाग होतील दूर, क्रीम-लोशनही यापुढे फेल
चांगली झोप
तळव्यांना मोहरीच्या तेलाने मसाज करून झोपल्यास चांगली झोप येण्यास मदत होते. मोहरीच्या तेलाने मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारते, स्नायूंना आराम मिळतो आणि झोपेचे चक्रही सुधारते. त्यामुळे नियमित मोहरीच्या तेलाने रात्री झोपण्यापूर्वी पायांना मालिश करावे असं सांगण्यात येते. आयुर्वेदात पायाच्या तळव्यांना मालिश करण्याचे अनेक फायदे सांगण्यात आलेत
ब्लड सर्क्युलेशन आणि मॉईस्चरसाठी
तळव्यांना तेलाने मसाज केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास सुरुवात होते. रक्त प्रवाह सुधारण्यासाठी, विशेषत: हिवाळ्यात, मोहरीच्या तेलाने तळवे मसाज केले जाऊ शकतात. तसंच तळवे मसाज केल्याने त्वचेला आर्द्रताही मिळते. मोहरीचे तेल त्वचेला मऊ ठेवते आणि त्वचेला आर्द्रता देखील देते. हे तेल तळव्यांना लावल्यास कोरडेपणा दूर होतो आणि टाचांना भेगा पडण्याच्या समस्येपासूनही आराम मिळतो.
बाळाला मालिश करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या
पाय राहतात स्वच्छ
शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच पाय स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. अशा स्थितीत तळव्यांना मोहरीच्या तेलाने मसाज केल्याने पायात घाण जमा होण्यापासून बचाव होतो. यामुळे तळवे स्वच्छ राहतात आणि चमकदार दिसतात. लोक तळव्यांची काळजी घेत नाहीत, त्यामुळे तळव्यांची त्वचा जास्त जाड होते आणि तडतडायला लागते. अशा परिस्थितीत मोहरीच्या तेलाने मसाज केल्याने तळव्यांची त्वचा मुलायम होण्यास मदत होते. यामुळे त्वचा खडबडीत राहत नाही.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.