अंकुरित चणे खाण्याचे फायदे (फोटो सौजन्य - iStock)
मोड आलेल्या चण्याला पौष्टिकतेचे पॉवरहाऊस म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. याच्या आरोग्यदायी फायद्यांमुळे हा आहारतज्ज्ञांचा आवडता आहार मानला जातो. खरे तर चणे अंकुरित झाल्यावर त्याचे पोषणमूल्य वाढते. मीठ आणि कांदा यामध्ये मिसळून खाल्ल्यास चव वाढेल. डाएटिशियन आयुषी यादव यांनी सांगितले की अंकुरित चणे खाल्ल्याने कोणते फायदे होतात. चण्याचे अनेक फायदे आहेत. तुम्ही आपल्या आहारामध्येदेखील मोड आलेल्या चण्याचा उपयोग करून घेतल्यास तुम्हाला फायदा मिळू शकतो. मोड आलेल्या चण्याची भाजी, सलाड वा आमटीदेखील तुम्ही करून खाऊ शकता. जाणून घ्या याचे अधिक फायदे (फोटो सौजन्य – iStock)
पोषण अधिक मिळते
अंकुरित चण्यामुळे चांगले पोषण मिळून पचनक्रियाही सुधारते
अंकुरित चणे आवश्यक पोषक तत्वांची जैवउपलब्धता वाढवते, ज्यामुळे तुमच्या शरीरात लोह, कॅल्शियम आणि बी जीवनसत्त्वे यांसारखी जीवनसत्त्वे आणि खनिजे शोषून घेणे सोपे होते आणि याचा शरीराला अधिक फायदा मिळतो. यामुळे शरीरात अधिक ताकद राहते आणि यातील फायबर तुमच्या शरीराला अधिक काळ मजबूत राहण्यास मदत मिळवून देते
चांगली पचनक्रिया
अंकुरित होण्याच्या प्रक्रियेमुळे फायटिक अॅसिडसारखे घटक कमी होतात, जे खनिज शोषणात व्यत्यय आणू शकतात आणि पाचन समस्या वाढवू शकतात. मोड आलेले चणे खाल्ल्याने तुमची पचनक्रिया सुधारते. यामध्ये अधिक प्रमाणा असलेले फायबर हे अन्न पचविण्यास मदत करते आणि त्याचप्रमाणे पोट अधिक काळ भरलेले राहते ज्यामुळे पटकन भूक लागत नाही. त्यामुळे सहसा नाश्त्यात अंकुरित चणे खाण्याचा सल्ला डाएटिशियन देतात.
मोड आलेल्या मुगाचे 6 जबरदस्त फायदे, लठ्ठपणा-डायबिटीसपासून मुक्ती मिळून बांधा होईल सुडौल
फायबरचा उत्तम सोर्स
अंकुरित चणे हे आहारातील फायबरचा एक उत्कृष्ट स्त्रोत आहे, जे पचनाचे आरोग्य सुधारते आणि निरोगी आतड्याच्या हालचालींनादेखील प्रोत्साहन देते. फायबर योग्य नसल्यास अनेकदा पचनक्रियेची समस्या उद्भवते. मात्र नियमित तुम्ही आपल्या आहारात मोड आलेले चणे खाल्ल्यास शरीराला अधिक प्रमाणात फायबर मिळण्यास मदत मिळते आणि पचनक्रिया अधिक चांगली राहण्याही फायदा होतो
अधिक प्रमाणात प्रोटीन
कांदा आणि मीठ मिक्स करून अंकुरित चणे खावे
चणे हे वनस्पती-आधारित प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे, परंतु अंकुर वाढल्याने त्यातील प्रथिनांचे प्रमाण आणखी वाढते, ज्यामुळे ते शाकाहारी लोकांसाठी उत्कृष्ट आहार बनते. तुम्हाला जर प्रोटीन नैसर्गिक प्रमाणात मिळवायचे असेल तर तुम्ही आपल्या नाश्त्यामध्ये मोड आलेल्या चण्यांचे सेवन करावे. यामध्ये तुम्ही कांदा आणि मीठ मिक्स करून खाल्ल्यास त्याची चवदेखील वाढते आणि प्रोटीनही अधिक प्रमाणात मिळते
कमी ग्लायसेमिक निर्देशांक
अंकुरलेल्या चण्यामध्ये अत्यावश्यक अमिनो ॲसिड मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे शरीर मजबूत होते आणि स्नायूंची दुरुस्ती होते. तसंच याचा ग्लायसेमिक इंडेक्स न अंकुरित चण्यापेक्षा कमी असतो, याचा अर्थ ते रक्तातील साखरेची पातळी कमी करते आणि टाइप-2 मधुमेह असलेल्या रुग्णांना फायदा होतो. तुम्ही याचे सेवन केल्यास अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत मिळते
Pregnancy मध्ये चुकूनही खाऊ नका हे पदार्थ, होऊ शकतो गर्भभात
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.