हिवाळ्यात रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा 'ही' क्रीम
थंडीमध्ये त्वचा निस्तेज का होते?
चेहऱ्यावर आलेले डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी उपाय?
नाईट क्रीम बनवण्याची कृती?
वातावरणातील गारव्याचा परिणाम आरोग्यासोबतच त्वचेवर सुद्धा लगेच दिसून येतो. थंडीमुळे त्वचा खूप जास्त कोरडी होऊन जातो. त्वचा कोरडी झाल्यानंतर चेहऱ्यावर पांढरे डाग किंवा सुरकुत्या दिसू लागतात. याशिवाय रात्रीच्या वेळी त्वचा खूप जास्त काळवंडलेली आणि निस्तेज झाल्यासारखी वाटते. चेहऱ्यावर ग्लो कमी झाल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअरचा वापर करून त्वचेची काळजी घेतात. पण तरीसुद्धा त्वचेमध्ये कोणताच बदल दिसून येत नाही. डोळ्यांखाली डार्क सर्कल, सुरकुत्या, बारीक रेषा आणि पिग्मेंटेशनमुळे तरुण वयातच त्वचा अतिशय निस्तेज होऊन जाते. त्वचा सुंदर आणि चमकदार करण्यासाठी महिला दिवसभर स्किन केअर रुटीन, वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट इत्यादी अनेक गोष्टी करून घेतात. पण चेहऱ्यावर ग्लो मात्र अजिबात येत नाही.(फोटो सौजन्य – istock)
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, वेगवेगळ्या स्किन केअरचा वाढत वापर इत्यादी अनेक गोष्टींमुळे डोळ्यांभोवती काळे डाग, सुरकुत्या किंवा पिंपल्स येऊन त्वचा खराब होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर सुरकुत्या आणि डार्क सर्कल्स घालवण्यासाठी रात्री झोपताना घरगुती क्रीम तयार करण्याची सोपी कृती सांगणार आहोत. घरगुती पदार्थांपासून बनवलेली क्रीम त्वचा कायमच हायड्रेट आणि चमकदार ठेवण्यासाठी मदत करते. याशिवाय नाईट क्रीम लावल्यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारते.
क्रीम बनवण्यासाठी कोरफड जेल, एरंडेल तेल, विटामिन ई कँप्सूल एवढ्याच पदार्थ लागणार आहेत. क्रीम तयार करताना सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये कोरफड जेल घेऊन त्यात एरंडेल तेल, विटामिन ई कँप्सूल टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर तयार केलेली क्रीम बंद हवेच्या डब्यात भरून ठेवा. यामुळे क्रीम खराब होणार नाही. रात्री झोपण्याआधी नियमित नाईट क्रीम लावल्यास त्वचेचा खराब झालेला पोत सुधारेल आणि त्वचा चमकदार, सुंदर होईल. त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी रात्रीच्या वेळी क्रीम किंवा सीरम लावावे. यामुळे त्वचेवर लवकर प्रभावी दिसून येतो. याशिवाय डोळ्यांखाली वाढलेले काळे डाग घालवण्यासाठी विटामिन ई कॅप्सूल अतिशय प्रभावी ठरते.
प्रदूषण, मेकअप, धूळ-मळ, सूर्याच्या हानिकारक किरणांचा परिणाम त्वचेवर लगेच दिसून येतो. रात्रीच्या वेळी त्वचा डिटॉक्स होण्याची प्रक्रिया अतिशय जलद होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी नाईट क्रीम लावणे आवश्यक आहे. याशिवाय त्वचेचे रक्तभिसरण सुधारून त्वचा खूप जास्त हायड्रेट आणि निरोगी दिसते. चेहऱ्यावर वाढलेले काळे डाग किंवा बारीक मुरूम कमी करण्यासाठी रात्री झोपण्याआधी नेहमीच नाईट क्रीम लावावी. त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी कोरफडचा वापर करावा.






