मसाल्याचे माहेरघर म्हणून भारताची मागील अनेक शतकांपासून ओळख आहे. भारतासह इतर अनेक ठिकाणी मसाल्याची शेती केली जाते. भारतीय मसाल्यांच्या चवीमुळे आणि सुगंधामुळे सगळीकडे हे भारतातील मसाले ओळखले जातात. त्यातील प्रामुख्याने जेवणाच्या पदार्थांमध्ये वापरला जाणारा मसाला म्हणजे चक्रफुल. चक्रफुलाचा वापर जेवणातील पदार्थाची चव वाढवण्यासोबतच आरोग्यासाठी सुद्धा गुणकारी आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी तुम्ही चक्रफुलाच्या पाण्याचे सेवन करू शकता. आज आम्ही तुम्हाला चक्रफुलाचे सेवन केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सांगणार सांगणार आहोत.(फोटो सौजन्य-istock)
चक्रफुलाचे सेवन केल्यास आरोग्याला होणारे फायदे
वातावरणात सातत्याने होत असलेल्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सर्दी, खोकला किंवा इतर साथीच्या आजारांपासून वाचण्यासाठी आहारात चक्रफुलाच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे सर्दी, खोकला कमी होऊन आराम मिळेल.
चक्र फुलामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात. हे गुणधर्म त्वचेचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. त्वचेवर सतत पिंपल्स किंवा फोड येत असतील तर चक्रफूल प्रभावी ठरेल.
सतत बाहेरचे किंवा तेलकट तिखट पदार्थ खाल्यामुळे पोट बिघडून जाते. बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी रिकाम्या पोटी चक्रफुलाच्या पाण्याचे सेवन करावे. चक्रफुलाच्या पानांमध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
निद्रानाशावर चक्रफुल अतिशय गुणकारी आहे. मानसिक तणाव किंवा स्ट्रेसपासून सुटका मिळवण्यासाठी चक्रफुलाच्या पाण्याचे सेवन करावे. हे पाणी नियमित प्यायल्यामुळे आरोग्य सुधारून मन शांत होईल.
सकाळी उठल्यानंतर नियमित चक्रफुलाच्या पाण्याचे सेवन केल्यास शरीर डिटॉक्स होऊन शरीरातील विषारी पदार्थ बाहेरून पडून जातील.