रात्री वारंवार तहान लागते? शरीरसंबंधित दिसून येतात 'या' गंभीर आजाराची लक्षणे
रात्री झोपल्यानंतर अनेकांना वारंवार तहान लागते. काहींना अर्ध्या अर्ध्या तासांनी पाणी पिण्याची सवय असते तर काही रात्रभर अजिबात पाणी पित नाहीत. शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. मधुमेह झाल्यानंतर वारंवार तहान लागणे, लघवीला होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. चुकीच्या जीवनशैलीचे परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतात. त्यामुळे योग्य जीवनशैली फॉलो करणे आवश्यक आहे. आहारात होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, उच्च रक्तदाब आणि वाढलेला लठ्ठपणा आरोग्यासंबंधित गंभीर आजार होण्यासाठी कारणीभूत ठरतो. मधुमेह झाल्यानंतर रात्रीच्या वेळी अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. आज आम्ही तुम्हाला मधुमेह झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
रक्तात वाढलेली साखर आरोग्यासाठी अतिशय घातक ठरते. ज्यामुळे मधुमेह होतो. रक्तात वाढलेल्या साखरेकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी सतत जागरण केल्यामुळे झोप व्यवस्थित पूर्ण होत नाही. यामुळे शरीरात कायमच थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. वारंवार शरीरात अशक्तपणा जाणवत असेल तर दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.
मधुमेह झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे शरीरातील इतर अवयवांना गंभीर इजा पोहचते. शरीरातील नाजूक अवयव सडून जातात. त्यामुळे मधुमेह झाल्यानंतर आहारात बदल करून आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर रात्रीच्या वेळी अचानक घाम येणे किंवा हृदयाचे ठोके वाढून शरीराला हानी पोहचते.मधुमेह झाल्यानंतर सतत तोंड कोरडे पडून जाते.
मधुमेह झाल्यानंतर प्रामुख्याने दिसून येणारे लक्षण म्हणजे वारंवार तहान लागणे आणि लघवीला होणे. शरीरात इन्सुलिनची संवेदनशीलता वाढल्यामुळे वारंवार तहान लागणे, घसा कोरडा पडणे इत्यादी अनेक लक्षणे दिसून येतात. त्यामुळे मधुमेह झाल्यानंतर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे.अजिबात दुर्लक्ष करू नये.
चुकूनही पिऊ नका ‘या’ फळांचे रस! शरीराला फायदे होण्याऐवजी होईल गंभीर नुकसान, आतड्यांना पोहचेल हानी
मधुमेहाच्या गुंतागुंती टाळण्यासाठी उपाय:
मधुमेहाची काळजी घेणे हे आयुष्यभर चालणारे काम आहे.तुमच्या उपचारांच्या योजनेचे काटेकोरपणे पालन करा.गंभीर गुंतागुंत टाळण्यासाठी सक्रिय भूमिका घ्या.
मधुमेहाचे प्रकार कोणते?
शरीर स्वतःच्या इन्सुलिन-उत्पादक पेशींवर हल्ला करते, ज्यामुळे इन्सुलिनची कमतरता निर्माण होते. यावर उपचारांसाठी इन्सुलिन घेणे आवश्यक असते हा सर्वात सामान्य प्रकार आहे. यात, शरीर इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाही किंवा पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही.