Worst Foods For Fatty Liver: फॅटी लिव्हर रोग ही एक गंभीर स्थिती आहे. यामध्ये लिव्हरमध्ये अतिरिक्त फॅट जमा होते, ज्यामुळे यकृत नीट काम करू शकत नाही. अनेकांना रोजच्या चुकीच्या राहणीमानामुळे आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे फॅटी लिव्हरची समस्या असल्याचे दिसून येत आहे आणि हे प्रमाण वाढले असल्याचेही अनेक अभ्यासातून समोर आले आहे. मात्र यातून सावरण्यासाठी आपल्या आहाराची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण काही पदार्थांमुळे हा आजार होतो, इथे तुम्ही अशा 5 पदार्थांबद्दल जाणून घेऊ शकता. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. श्वेता पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली असून तुम्हीही वेळीच सावध व्हा (फोटो सौजन्य - iStock)
चुकीच्या राहणीमानाच्या पद्धत, अवेळी खाणे, प्रमाणाच्या बाहेर अल्कोहोल पिणे या सगळ्यामुळे तरूणांनाही आता फॅटी लिव्हरचा त्रास सुरू होऊ लागला आहे. फॅटी लिव्हर टाळण्यासाठी कोणते पदार्थ खाऊ नयेत जाणून घ्या
फॅटी लिव्हरचा त्रास असेल तर फ्रेंच फ्राईज, समोसा, चिप्स, बर्गर यांसारखे तळलेले आणि जास्त चरबीयुक्त पदार्थ टाळावेत. या पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट्स आणि सॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे यकृतामध्ये चरबीचे प्रमाण वाढते
बर्फी, केक, कोल्ड्रिंक्स आणि मिठाई यांसारखे गोड पदार्थ देखील फॅटी लिव्हरसाठी हानिकारक असू शकतात. यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे यकृताची स्थिती बिघडू शकते
अल्कोहोल यकृताच्या पेशींचे नुकसान करते आणि चरबी जमा होण्याची प्रक्रिया वाढवते. अल्कोहोलच्या सेवनाने यकृताची जळजळ, सिरोसिस आणि इतर गंभीर समस्या उद्भवू शकतात, जे प्राणघातकदेखील ठरू शकतात
लाल मांस आणि प्रक्रिया केलेले मांस फॅटी लिव्हरसाठी हानिकारक असू शकते. या पदार्थांमध्ये संतृप्त चरबी, नायट्रेट्स आणि इतर हानिकारक रसायने असतात, ज्यामुळे लिव्हरच्या कार्यामध्ये व्यत्यय येतो
खारट स्नॅक्स ज्याला सोडियमयुक्त पदार्थ असेही म्हणतात, पॅक केलेले सूप, कॅन्ड फूड आणि सॉस यांसारखे सोडियमचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ यकृताचे फॅटी वाढवू शकतात