लिव्हरशी संबंधित समस्या सुरू झाल्यानंतर शरीर काही संकेत देत असते. सतत थकवा जाणवणे, भूक कमी लागणे किंवा अचानक वजन कमी होणे, वारंवार मळमळ होणे, अपचनाचा त्रास जाणवणे किंवा पोट जड वाटणे यांचा समावेश होतो. याशिवाय शरीरात अशक्तपणा जाणवणे, दैनंदिन कामांमध्ये उत्साह कमी होणे तसेच काही प्रकरणांमध्ये त्वचेवर खाज येणे किंवा शरीराच्या काही भागांवर हलकी सूज दिसणे ही देखील लिव्हरच्या बिघाडाची सुरुवातीची चिन्हे असू शकतात. ही लक्षणे सतत जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन आवश्यक वैद्यकीय तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे.
लिव्हर नीट कार्य करत नसल्यास शरीरातील बिलीरुबिन हे पिवळसर रंगद्रव्य योग्य प्रकारे बाहेर टाकले जात नाही. त्यामुळे रक्तातील त्याचे प्रमाण वाढते आणि डोळे तसेच त्वचा पिवळी पडू लागते. ही स्थिती कावीळ म्हणून ओळखली जाते. अनेकजण तिला वेगळा आजार समजतात, परंतु ती लिव्हरच्या बिघाडाचे महत्त्वाचे लक्षण असू शकते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
High Protein Fruits: प्रोटीनसाठी फक्त अंडीच नाही! ‘ही’ फळे ठरू शकतात उत्तम पर्याय






