आठवड्यातून एकदा केसांना दही लावण्याचे फायदे
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये दह्याचे सेवन केले जाते. दही खाल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि शरीरात थंडावा निर्माण होतो. दही खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. दैनंदिन आहारात नियमित वाटीभर दह्याचे सेवन केल्यास आरोग्यासह त्वचा आणि केसांना अनेक फायदे होतील. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारून त्वचा मऊ आणि मुलायम होण्यास मदत होईल. दह्यामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम आढळून येते. हाडांच्या निरोगी आरोग्यासाठी आणि वाढीसाठी कॅल्शियम अतिशय महत्वाचे आहे. दह्याचे सेवन केल्यामुळे केसांना अनेक फायदे होतात. केसांच्या वाढीसाठी नियमित दह्याचे सेवन करावे.(फोटो सौजन्य – iStock)
घनदाट-लांबलचक केसांसाठी 5 रुपयांचा ‘हा’ पदार्थ ठरेल रामबाण, फक्त अशाप्रकारे करा वापर
थंडीच्या दिवसांमध्ये केसांसंबधित अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. सतत केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे, रुक्ष आणि ड्राय होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. दह्यामध्ये असलेले अँटीफंगल गुणधर्म केसांच्या वाढीसाठी आणि केसांसंबधित समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतात. आठवड्यातून एकदा केसांना दही लावल्यास केस मुलायम आणि सॉफ्ट होतील. याशिवाय केस लांबलचक होण्यास मदत होईल. आज आम्ही तुम्हाला आठवड्यातून एकदा केसांना दही लावल्यास कोणते फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
दह्यामध्ये असलेले लॅक्टिक अॅसिड केसांच्या मुळांना पोषण देते, ज्यामुळे केसांची निरोगी वाढ होते. केसांच्या वाढीसाठी दही अतिशय फायदेशीर आहे. नैसर्गिकरित्या केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी आठवड्यातून एकदा केसांना दही लावावे. दही लावल्यामुळे केस सुंदर आणि चमकदार दिसतात. केसांमध्ये थंडावा निर्माण होतो. याशिवाय पोषक घटकांनी समृद्ध असलेले दही केसांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम करते. त्यामुळे केसांना आठवड्यातून एकदा दही लावावे.
केसांच्या वाढीसाठी दही अतिशय फायदेशीर ठरते. यामध्ये प्रथिने आणि जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. दही लावल्यामुळे केस मजबूत आणि चमकदार दिसतात. आठवड्यातून एकदा केसांना दही लावून काहीवेळ ठेवून नंतर २ मिनिटं हलक्या हाताने मसाज करून घ्या. त्यानंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ करून घ्या.
चारचौघांमध्ये हसण्याची लाज वाटते? मग ‘हे’ उपाय करून कमी करा दातांवर साचून राहिलेला पिवळेपणा, दात दिसतील पांढरेशुभ्र
दह्यामध्ये असलेले लॅक्टिक अॅसिड केस चमकदार आणि सुंदर करण्यासाठी मदत करते. केसांमधील चमक आणखीन वाढवण्यासाठी केसांना वरून पोषण देण्यासोबतच आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. यासाठी दैनंदिन आहारात दह्याचे सेवन करावे. दह्याचे सेवन केल्यामुळे शरीराला आवश्यक असलेले घटक मिळतात.






