दातांवर पिवळा थर साचून राहण्याची कारणे
दैनंदिन आहारात साखरयुक्त पदार्थांचे अतिसेवन आणि तेलकट तिखट पदार्थांचे सतत सेवन करून दातांच्या आरोग्याची व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे दातांवर पिवळेपणा साचणे, कीड लागणे, दात अचानक पडणे, हिरड्यांसंबंधित समस्या उद्भवणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. दातांसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर दातांचे आरोग्य पूर्णपणे खराब होऊन जाते. दातांवर साचलेला पिवळा थर कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. मात्र तरीसुद्धा पिवळेपणा कमी होत नाही. दातांवरील पिवळेपणामुळे चारचौघांमध्ये गेल्यानंतर हसण्याची किंवा बोलण्याची अनेकदा लाज वाटू लागते. दातांचे आरोग्य खराब झाल्यानंतर श्वसन मार्गाची दुर्गंधी येण्यास सुरुवात होते.(फोटो सौजन्य – iStock)
दातांवर पिवळा थर किंवा पांढऱ्या रंगाचा थर साचून राहिल्यानंतर तो कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे प्रयत्न केले जातात. कधी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या टूथपेस्ट लावल्या जातात, तर कधी घरगुती उपाय करून दात स्वच्छ केले जातात. मात्र चुकीच्या पद्धतीने उपाय केल्यामुळे दातांवरील पिवळेपणा कमी होण्याऐवजी आणखीनच वाढतं जातो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला दातांवर साचून राहिलेला पिवळा थर कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे घरगुती उपाय योग्य पद्धतीने केल्यास दातांवर साचून राहिलेला पिवळा थर कमी होऊन दात स्वच्छ होतील आणि दातांची दुर्गंधी कमी होईल.
दातांवर पिवळा थर साचून राहण्याची कारणे
दातांवरील पिवळेपणा कमी करण्यासाठी घरगुती उपाय केल्यास टूथपेस्टमध्ये बेकिंग सोडा टाकून दात स्वच्छ करावे. यामुळे दातांवर साचून राहिलेला पिवळेपणा कमी होऊन दात स्वच्छ दिसतील. टूथपेस्ट आणि बेकिंग सोड्याचे मिश्रण दातांवर लावल्यामुळे पिवळेपणा कमी होण्यासोबतच प्लाकसुद्धा कमी होऊन जातो. याशिवाय दातांमध्ये लागलेली कीड नष्ट होते. हा उपाय आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केल्यास दात स्वच्छ होण्यास मदत होईल. तसेच बेकिंग सोड्याचा वापर करताना जास्त प्रमाणात करू नये. टूथपेस्ट घेतल्यानंतर त्यावर चिमूटभर बेकिंग सोडा घेऊन दात स्वच्छ करावे.