संग्रहित फोटो
याप्रकरणी सहा जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष मोकाशी, तानाजी भोसले, अमर भोसले, गोट्या चव्हाण, लारा (पूर्ण नांव नाही) व बाळू नाईक (सर्व, रा. चंदूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सौरभ बाळू भिरुगडे (वय २४ रा. जुना चंदूर रोड बरणे मळा) याने फिर्याद दिली आहे.
सौरभ भिरुगडे व त्याचा मित्र सुरज साबळे हे दोघे चंदूर येथील मराठी शाळेत गॅदरींग कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी संतोष मोकाशी याने आडवी लावलेली मोटरसायकल बाजूला घ्यावी असे सौरभने सांगितले. त्यावरून वाद होऊन संतोष मोकाशी याने कोयत्याने सौरभच्या डोक्यात वार केला. तर तानाजी भोसले, अमर भोसले, गोट्या चव्हाण, लारा व बाळू नाईक यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कोयत्याच्या हल्ल्यात सौरभ हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.






