विटामिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात 'या' पदार्थांचे सेवन करा
जगभरातील अनेकांमध्ये विटामिन बी 12 ची कमतरता असल्याचे दिसून आले आहे. ही समस्या भारतीयांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून आली आहे. विटामिन बी 12 ची कमतरता जाणवू लागल्यानंतर शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवतात. जीवनशैलीमध्ये सातत्याने होत असलेल्या बदलांचे परिणाम आरोग्यावर दिसून येतो. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल, अपुरी झोप, सतत बाहेरचे पदार्थ खाणे इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात जीवनसत्त्वांची अभाव निर्माण झाल्यानंतर शरीरात विटामिन बी 12 ची कमतरता निर्माण होते. विटामिन बी 12 ची कमतरता जाणवू लागल्यानंतर अशक्तपणा, थकवा, न्यूरोलॉजिकल समस्या आणि अशक्तपणा इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात.
विटामिन बी 12 च्या कमतरतेमुळे जीवनशैलीमध्ये बिघाड होऊन जातो. जगभरात बदलत चाललेली फॅशन आणि ट्रेंडमुळे अनेक बदल होत आहे. याचा परिणाम लोकांच्या जीवनशैलीवर दिसून आला आहे. विटामिन बी 12 ची कमतरता निर्माण झाल्यानंतर सातत्याने थकवा जाणवल्यामुळे ऑफिसमध्ये गेल्यानंतर किंवा इतर वेळी खूप झोप येते. जीवनसत्वाची कमतरता जगभरात अनेकांमध्ये दिसू आली आहे. आज आम्ही तुम्हाला विटामिन बी १२ ची कमतरता जाणवू लागल्यानंतर कोणती लक्षणे दिसतात आणि विटामिन बी 12 ची कमतरता कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
विटामिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचे सेवन करा