केशर तेलाचे त्वचेला असलेले फायदे
वाढत्या वयासोबतच महिलांच्या शरीरात अनेक बदल दिसून येतात. बदलत्या जीवनशैलीमुळे वयाच्या तिशीमध्येच महिलांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या, बारीक रेषा, पिगमेंटशेंन इत्यादी अनेक गोष्टी दिसून येतात. त्यामुळे योग्य ती जीवनशैली जगून आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. महिलांच्या शरीरात सातत्याने हार्मोनल असंतुलन होत असते, त्याचा सार्वधिक परिणाम महिलांच्या चेहऱ्यावर दिसून येतो. अनेक महिला सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी काहींना काही उपाय करत असतात. पण यामुळे अनेकदा त्वचा खराब होण्याची शक्यता असते. त्वचेला कोणतेही प्रॉडक्ट लावण्याआधी ते तुमच्या त्वचेला सूट होईल की नाही, प्रॉडक्ट बनवण्यासाठी कोणते घटक वापरले आहेत, हे सुद्धा व्यवस्थित तपासून पहावे.(फोटो सौजन्य-istock)
सुंदर चमकदार त्वचा मिळवण्यासाठी बाजारात मिळणारे महागडे आणि केमिकल युक्त प्रॉडक्ट वापरण्यापेक्षा घरगुरी पदार्थांचा वापर करावा. नैसर्गिक गोष्टी त्वचेवरील चमक कायम टिकवून ठेवतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये केशर तेलाचा वापर करू शकता. केशराचे तेल त्वचा आणि केसांना लावल्यामुळे अनेक गुणकारी फायदे होतात. हे आयुर्वेदिक तेल असून मागील अनेक वर्षांपासून या तेलाचा वापर केला जात आहे. कुंकुमादी या शब्दाचा अर्थ “केशर तेल’ असा होत असल्यामुळे अनेक लोक हे तेल वापरतात. केशरपासून टोनर, तेल, हेअर सिरम इत्यादी अनेक गोष्टी बनवल्या जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी केशर तेलाचा वापर कसा करावा, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
हे देखील वाचा: डोळ्यांखाली खोबरेल तेल लावण्याचे आहेत ‘हे’ 5 फायदे, आजच जाणून घ्या
हे देखील वाचा: रक्तदाब प्रभावीपणे व्यवस्थापित करणार ‘रेनल डिनरव्हेशन’ उपचार पद्धती