बदलत्या काळानुसार आपल्या चेहऱ्यावर अनेक बदल होऊ लागतात. आरोग्याप्रमाणेच आपल्या चेहऱ्याचीही योग्य रीतीने निगा राखणे गरजेचे आहे. चेहरा हा आपली ओळख असतो. चेहऱ्याची काळजी न घेतल्यास कालातंराने तो खराब होऊ लागतो आणि यामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जसजसे आपले वय वाढते तसतसे आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात मात्र आताच्या काळात वयापूर्वीच अनेकांना सुरकुत्यांच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
आपल्या सौंदर्यात बाधा ठरणारी ही समस्या दुर करण्यासाठी बहुतांश मंडळी महागड्या कॉस्मेटिक्स, ब्यूटी ट्रिटमेंटचा वापर करताना दिसतात. पण या सर्वांचा परिणाम काही कालावधीपुरताच असतो.सुरकुत्या येण्याचे मुख्य कारण म्हणजे, वृद्धत्व, तणाव, हार्मोन्सचे असंतुलन आणि कोलेजन आणि प्रोटीनची कमतरता.या कारणांमुळे पुरुष असो वा महिला अनेकांना अकाली वृद्धत्व आल्याचे पाहायला मिळते. मात्र योग्य आहाराने तुम्ही ही समस्या दूर करू शकता. काही पदार्थ त्वचेचे आरोग्य राखतात ज्यांना ज्याला अँटी एजिंग फूड्स असे म्हटले जाते. तुम्हीदेखील सुरकुत्या किंवा वृद्धत्वाच्या समस्येने त्रस्त असाल तर आजच आपल्या आहारात खाली दिलेल्या पदार्थांचा समावेश करा.
हेदेखील वाचा – शेफ पंकजची भन्नाट ट्रिक! नवीन भांड्यांवरचे चिकट स्टिकर्स क्षणार्धात वेगळे होतील
फ्लॉवर ही एक भाजी असून अनेकांना ही भाजी खायला फारशी आवडता नाही. लहान मुलेच काय तर अनेक मोठी मंडळीही ही भाजी खाण्यास नकार देतात. मात्र फ्लॉवर तुमच्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी खूप फायद्याचा आहे. यात व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आहे, जे कोलेजनचे उत्पादन करण्यास मदत करते आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यास मदत करते. तसेच यामुळे त्वचेची लवचिकता वाढण्यास मदत मिळते.
अक्रोडचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी खूप फायद्याचे ठरते. हे मृत पेशी साफ करण्यास आणि वृद्धत्त्वाची समस्या दूर करण्यास मदत करते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही घराच्या घरे अक्रोडपासून स्क्रब तयार करून आपल्या चेहऱ्यावर लावू शकता.
चिया सीड्स फार फायद्याच्या असून तुम्ही तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये यांचा समावेश करू शकता. द्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी, त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी, चेहऱ्यावरील सूज आणि लालसरपणा कमी करण्यासाठी तसेच मुरुम आणि डाग कमी करण्यासाठी याची मदत होते. अधिक काळ तरुण राहायचे असल्यास आजच आपल्या आहारात चिया सीड्सचा समावेश करा.