भांडी आपल्या स्वयंपाक घरातील एक महत्तवपूर्ण गोष्ट आहे. प्रत्येकाच्या घरात वेगवेगळ्या प्रकराची भांडी वापरली जातात. कुकर, कढई, ताट अशा अनेक प्रकारच्या भांड्यांचा वापर आपण आपल्या रोजच्या जीवनात करत असतो. मात्र या सर्व भांड्यांमध्ये एक सामान गोष्ट दिसून येते ती म्हणजे यावर लावण्यात येणारे कंपनीचे स्टिकर. आपण जेव्हाही कोणते नवीन भांडे खरेदी करतो तेव्हा त्यावर एक कंपनीचे स्टिकर लावलेले असते. हे स्टिकर इतके चिकट असते की आपण कितीही प्रयत्न केला तरी हे स्टिकर काही निघायचे नाव घेत नाही.
अनेकदा हे स्टिकर भांडे खराब होईपर्यंत भांड्यांवरच चिकटलेले असते. बऱ्याचदा लोक जेव्हा प्रयत्न करूनही हा स्टिकर निघत नाही तेव्हा याला दूर करण्याचा विचार मनातून काढतात आणि तसेच स्टिकरसह त्या भांड्याचा वापर करू लागतात. मात्र असे करणे फार घातक ठरू शकते. भांडे गरम झाल्यावर या स्टिकरचा काही भाग तुमच्या अन्नात मिसळत राहते. ते काढण्यासाठी तुम्ही कधीकधी नखे किंवा चाकू वापरू शकता. पण यामुळे भांड्यांवर खुणा पडू शकतात.अशा परिस्थितीत ते वाईट देखील दिसेल.
हेदेखील वाचा – PM मोदींचा सल्ला! नाश्त्यात करा ‘या’ हेल्दी पदार्थाचा समावेश, जाणून घ्या रेसिपी
तुम्हीही भांड्यांवरील या चिकट स्टिकरने त्रस्त असाल आणि याला दूर करण्याचा एक सोपा मार्ग शोधत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी यासाठीचा एक सोपा उपाय घेऊन आलो आहोत. मास्टर शेफ पंकज भदौरिया यांनी ही समस्या दूर करण्यासाठी एक सोपा उपाय सांगितला आहे. या उपायाच्या मदतीने तुम्ही अगदी सहज आणि त्वरित भांड्यांवरील स्टिकर दूर करू शकता.
तुम्ही नवीन भांडे खरेदी करून घरी आणले मात्र अथक प्रयत्नांनंतरही यावरील स्टिकर दूर होत नसेल तर हा उपाय तुमच्या कमी येईल. यासाठी प्रथम गॅस ऑन करा. तुम्हाला ज्या भांड्यावरील स्टिकर काढायचे आहे, त्या भांड्याची बाजू गॅस स्टोव्हवर ठेवा आणि किंचित गरम होऊ द्या. असे केल्यानंतर भांड्यावरील स्टिकर अगदी सहज दूर होईल.
View this post on Instagram
A post shared by MasterChef Pankaj Bhadouria (@masterchefpankajbhadouria)
स्टिकर कधी जर यावर चिकट डाग राहिले असतील तर ते दूर करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. यासाठी स्टिकरच्या भागावर थोडे मीठ आणि तेलाचा एक थेंब घाला. आता ते बोटाने चोळा. यानंतर टिश्यू पेपरने पुसून घ्या. या उपायाने अगदी सहज हा चिकट डाग दूर होईल.