फोटो सौजन्य: iStock
नवीन वर्षात अनेक जण वेगवेगळे संकल्प करताना दिसतात. काही जण जिम लावण्याचा संकल्प करतात तर काही मद्यपान सोडण्याचा. पण या सर्व संकल्पात तुम्ही तुमचे आरोग्य उत्तम ठेवण्याचा संकल्प करणे फार महत्वाचे आहे. आरोग्य उत्तम असेल तर तुम्ही एक उत्तम आणि आनंददायी जीवन जगू शकता.
हल्ली अनेक जण विविध गोष्टींवर पैसे खर्च करताना दिसतात. पण जेव्हा विषय आरोग्याचा येतो तेव्हा पैसे खर्च करायला अनेकांच्या जीवावर येत असते. त्यातही खूप कमी जण असतात जे नियमितपणे हेल्थ चेकअप टेस्ट करत असतात. हेल्थ चेक टेस्ट्स करणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. कारण या टेस्ट्समुळेच आपल्याला शरीरातील अन्य गोष्टी समजतात. चला जाणून घेऊया, 2025 मध्ये कोणते 5 हेल्थ चेकअप तुम्ही केले पाहिजे.
चिकन की मटण, दोन्हीपैकी कोणत्या पदार्थाने होते लोहासारखे टणक शरीर, डाएटिशियनचा खुलासा
कम्प्लिट ब्लड काउंट (CBC): ही एक सिम्पल टेस्ट आहे जी तुमच्या रक्तातील लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्त पेशी आणि प्लेटलेट्सची संख्या तपासते. ही टेस्ट अशक्तपणा, संसर्ग आणि इतर अनेक रोग शोधण्यात मदत करते.
ब्लड शुगर टेस्ट: ही टेस्ट तुमच्या रक्तातील साखरेची पातळी मोजते. त्यामुळे मधुमेहाचा शोध घेण्यास मदत होते. मधुमेह हा एक गंभीर आजार आहे ज्याला वेळीच रोखले नाही तर अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.
ब्लड प्रेशर चेक: हाय ब्लड प्रेशर हा एक सायलेंट किलर आहे. हा आजार सहसा कोणत्याही लक्षणांशिवाय उद्भवू शकतो. ब्लड प्रेशर नियमितपणे तपासणे खूप महत्वाचे आहे. हाय ब्लड प्रेशरमुळे हृदयविकार, स्ट्रोक आणि किडनीच्या आजारांचा धोका वाढतो.
कोलेस्टेरॉल टेस्ट: कोलेस्टेरॉल हा तुमच्या रक्तात आढळणारा एक प्रकारची चरबी आहे. हाय कोलेस्टेरॉलमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
थायरॉईड टेस्ट: थायरॉईड ग्लॅन्ड तुमच्या शरीरातील मेटाबॉलिज्म नियंत्रित करते. थायरॉईडच्या समस्या अनेक प्रकारच्या असू शकतात जसे की हायपरथायरॉईडीझम आणि हायपोथायरॉईडीझम. थकवा, वजन वाढणे किंवा गळणे, केस गळणे इत्यादी या समस्यांच्या लक्षणांचा समावेश होतो.
नवीन वर्षाचा आनंद गगनात मावेना! कंडोमपासून ते द्राक्षांपर्यंत, लोकांनी खरेदी केल्यात ‘या’ गोष्टी
आजार वेळेत सापडतात: नियमित आरोग्य तपासणीमुळे अनेक गंभीर आजार वेळेत ओळखले जातात, त्यामुळे त्यांच्यावर सहज उपचार होऊ शकतात.
जीवनशैलीत सुधारणा– आरोग्य तपासणीच्या अहवालांवरून, जीवनशैलीत कोणकोणत्या सुधारणा आवश्यक आहेत हे कळू शकते.
शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये सुधारणा – नियमित हेल्थ टेस्ट तुम्हाला तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याबद्दल अधिक जागरूक करते.
वार्षिक हेल्थ टेस्ट: वर्षातून एकदा तरी फुल्ल हेल्थ टेस्ट करावी.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार: तुम्हाला कोणत्याही आजाराचा धोका असल्यास किंवा काही लक्षणे दिसत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हेल्थ टेस्ट करून घ्यावी.